11 C
New York

Darius Visser : T20I मध्ये एक षटकात 39 धावा केलेल्या समोआविरुद्ध वानूआतूचा मनोरंजक सामाना

Published:

निर्भयसिंह राणे

डॅरियस व्हिसरने (Darius Visser) सध्या सुरू असलेल्या आयसीसी मेन्स सब-रीजनल पात्रता स्पर्धेत वानूआतूविरुद्ध (Vanuatu) शानदार शतक झळकावून जागतिक क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले आहे. सामोआकडून (Samoa) खेळताना व्हिसरने 62 चेंडूत 132 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 14 षटकार आहेत.

Babar Azam: पहिल्या कसोटीत बाबर आजम शून्य धावांवर बाद

सामोआच्या इनिंग्समधल्या 15व्या षटकात वानूआतूच्या मध्यमगती गोलंदाज नलिन निपीकोला (Nalin Nipiko) डॅरियसने लागोपाठ 3 षटकाराने ओवरची सुरुवात केली. पुढच्या चेंडूवर निपीकोने दबावाखाली नो बॉल टाकला आणि त्यानंतरच्या फ्रीहिटवर डॅरियसने षटकार ठोकला. त्यानंतरच्या एक डॉट बॉल नंतर परत एक नो बॉल टाकला ज्यावर पुन्हा एक षटकार मारला तोही नो बॉल होता. समोआने शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारून ओवर संपवली, तीही फरीहिट होती.

डॅरियसने एकूण 36 धावा केल्या आणि तीन नो-बॉल म्हणजे समोआने एक षटकात 39 धावा केल्या. सध्या एक षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डॅरियस व्हिसरच्या नावावर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img