26.5 C
New York

Mohsin Khan: धक्कादायक.… ३१ व्या वर्षी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका

Published:

Mohsin Khan: “मोहसीन खान “रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतून घरापर्यंत पोहचला.हि छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अशी मालिका आहे. कित्येक वर्ष हि मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेमध्ये त्याने (Kartik)कार्तिक ची भूमिका साकारली होती. आणि नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मला हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय असा खुलासा केलाय.

या मुलाखतीमध्ये त्याने मला गेल्या वर्षीच हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. गेल्या वर्षी मला माइल्ड हृदयविकाराचा झटका येऊन गेला परंतु, मी या बदल कोणाला काहीच कल्पना दिली नाही. मी हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमीट होतो. या उपचारानंतर आम्ही २ – ३ हॉस्पिटलमध्येही दाखवून घेतलं. पण आता सर्व सुरळीत आहे. सध्याच जीवन हे फास्ट जीवन आहे. त्यामुळे याचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम होतो. तुम्हाला दारू पिण्याचं सेवन नसले तरी तुम्हाला फॅटी लिव्हर असू शकत.असं मोहसीनने या वेळेस सांगितलं.

विरोधकांच्या ‘लाडकी बहीण योजने’च्या टीकेवरुन अजितदादा बरसले

“ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतून मोहसिनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २०१६ ते २०२१ अशी सलग चार वर्षे त्याने प्रेक्षकांचं छान मनोरंजन केलं. मोहसिन आणि शिवांगी जोशी यांची या मालिकेतील जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img