15.6 C
New York

Eknath Shinde : आमचं हप्ते घेणारं सरकार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

Published:

कोल्हापुर

आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केलीयं. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojna) दोन हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारचा दाखल देत सडकून टीका केलीयं. ते कोल्हापुरातील आयोजित मेळाव्यात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते सरकारकडून महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही ही योजना 1500 रुपयांवरच थांबणार नाही. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल, तेव्हा 1500 रुपयांचे 3 हजार होतील कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाहीत. ही देना बॅंक आहे लेना नाही. ज्यांनी कधी दिलं नाही त्यांना कधी कळणार, काही लोकं टिंगल करतात, वेडे खुळे काहीही म्हणताहेत, पैसे आल्यावर म्हणतात की लवकर पैसे काढा त्यांचं बरोबर आहे, दोन हफ्ते आम्ही महिलांच्या खात्यात टाकले आहेत, पूर्वीसारखं हप्ते घेणारं हे सरकार नाही, अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं.

एकनाथ शिंदे म्हणाले, पैसे मिळणार नाही, असं विरोधक सांगतात, ते एवढ्यावर नाही थांबले कोर्टातही गेले, असं राजकारण कोणी करु नये. एकतर विरोधकांनी दिलं नाही आम्ही देतोयं तर ते थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? या योजनेमुळे आमच्या महिला भगिनींचं मोहोळ उठलंय. तुम्ही कितीही योजना बदनाम करण्याचं काम केलं तरीही आमच्या बहीणींचा विश्वास आहे, ही योजना फसवी, खोटी असल्याचं सांगणारे विरोधक कार्यालयासमोर या योजनेचे बॅनर लावत आहेत, पण त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही स्वत:चा फोटो टाकत आहेत. काय चाललंय हे कुठे फेडाल हे पाप? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरसले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, आता महिलांच्या कोणत्या योजनेत विरोधकांनी खोडा घातला तर खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा, असा जोडा दाखवला तर ते तुमच्यामध्ये येणार नाहीत. कितीही काहीही केलं तरीही ही योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो जे करणार तेच आम्ही बोलणार खोटं आश्वासने देणार नाही. ज्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्याच्या दोन दिवस आधी आम्ही निधी दिलायं. 14 तारखेपासूनच खात्यात पैसे होऊ लागले महिला बाल विकास टीमकडून योजनेचं जोरदार काम सुरु आहे. 1 कोटी 10 लाख बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. हे आत्तापर्यंतच्या इतिहासातलं पहिलं काम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, तसेच कोरोना काळात विरोधकांनी पुणे, मुंबईत काय काय केलंय, जिथं तिथं मिळेल तिथल्या रुग्णांच्या नातेवाईंकांच्या तोंडाचा घास काढून घेतला. आनंदाचा शिधा योजनेतही विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यासाठीही कोर्टात गेले मात्र, त्यांचं अपील कोर्टाने फेटाळून लावलं अन् बहीणींचा विजय झाला. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीयं. लोकसभेतही खोटं नरेटिव्ह पसवून त्यांनी लोकांची दिशाभूल केली काही लोकांची मते मिळवली पण माणूस एकदाच फसतो, या योजनेत खोडा घातला तर योजना रद्द होईल असं त्यांना वाटलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img