15.6 C
New York

Badlapur Crime: अक्षय निर्दोष आहे..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा

Published:

Badlapur Crime: बदलापूर प्रकरणातील दोन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, या करीता बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले.(Badlapur) बदलापूर रेल्वे स्थानकातही मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला. मात्र या सर्व घटनेनंतर अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा त्याच्या पालकांनी केलाय.

नेमकी काय घटना घडली?
बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने अक्षय शिंदे याने घृणास्पद कृत्य केल. या घटनेचा उद्रेक २० ऑगस्ट दिवशी बदलापूरमध्ये पाहयला मिळाला. या दरम्यान रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. मात्र आता अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी आता वेगळाच दावा केलाय.

फुल ऑन राडा…’, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार नॉमिनेशन टास्क

आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा दावा काय?

या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे आई वडील आणि त्याच्या लहान भावाशी फोन वरून संवाद साधण्यात आला. तेव्हा त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर वेगळं वळण देणारा दावा केला. अक्षय ने जे मुलींसोबत जे काही केले, असा कोणताच प्रकार घडला नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. आणि त्याला फसवण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

अक्षयचे आई वडील काय म्हणाले, १७ तारखेला पोलिसांनी त्याला पकडलं. आणि त्याला धरून नेलं इतकच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी त्याला मारहाण केली. तसच माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. अक्षय ११ वाजता बाथरूम धुवायला जात होता. त्याला बाकी कोणतच काम दिल न्हवत. नंतर तो शाळेत झाडू मारायचा. व संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळा सुटली की झाडू मारायचा. संपूर्ण कुटुंब आमचं तिथेच कामाला होत. तो थोडा डोक्याने अधु देखील आहे. बालपणी त्याला थोडा त्रास होत होता, तसेच डोक्याने तो थोडं कमजोर देखील होता. त्याचे औषधोपचार सुरु होते.अक्षय ने यातला कोणताच प्रकार केला नाही. असं त्याच्या आई वडिलांनी सांगितलंय.

आम्हाला मारहाण करण्यात आली

“आमच्या घरात ती लोक शिरले, आणि आम्हला मारहाण करण्यात आली. व घराबाहेर ढकलून दिल. तुम्ही इथे राहूच नका असं आम्हाला सांगितलं. आमचं काहीच एकून घेतलं नाही .” असं अक्षयचे वडील म्हणाले. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना हा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.


ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img