21.7 C
New York

MPSC Exam : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार? फडणवीसांनी दिली माहिती

Published:

मुंबई

येत्या रविवारी एमपीएससीची परीक्षा (MPSC Exam) आणि आयबीपीएसची परीक्षा (IBPS Exam) एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींचा मोठा गोंधळ उडाला आहे. या परीक्षेची तारीख बदलण्यासही आयोगाने स्पष्ट नकार दिला होता. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत करण्यास नकार देत त्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जाईल असे परिपत्रक आयोगाने काढले आहे. 25 ऑगस्टची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यात यावी आणि कृषीच्या जागाही राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतून भरल्या जाव्यात यासाठी पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जमले आहेत. त्यामुळे याच मुद्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजनाची पूर्व तयारी झाली आहे. या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे एमपीएससीने आज परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज 21 ऑगस्टला म्हणजेच दुसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलनास सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा असं म्हणत घोषणाबाजी केली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर यासंदर्भात माहिती देत विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img