20.4 C
New York

IPL 2025 : बीसीसीआय आणणार हा नियम परत ज्यांनी सीएसकेला होणार फायदा

Published:

निर्भयसिंह राणे

आगामी आयपीएल (IPL 2025) लिलावात खेळाडूंच्या नियमांमध्ये जुना नियम परत आणला जाण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) IPL 2025 च्या आधी जुना रिटेन्शन नियम परत आणण्याची शक्यता आहे. नियमानुसार पाच वर्षांहून अधिक काळ निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड श्रेणीत टाकले जाईल. जर हा नियम लागू झाला तर चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) हा एक मोठा विजय असेल ज्यांना अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमानुसार भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याची संधी मिळेल.

एक वृत्ताशी बोलताना सूत्राने सांगितले की, “नियम परत येण्याची दाट शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा झाली होती आणि खेळाडूंचे नियम जाहीर झाल्यावर ते परत आणले जाऊ शकतात. न्यूजबाइट्सच्या अहवालानुसार, जर अनकॅप्ड प्लेयर रिटेन्शन पॉलिसी लागू झाली, तर CSK भारताच्या माजी कर्णधाराला ₹4 कोटींमध्ये कायम ठेवू शकेल. खेळाडू रिटेन ठेवण्याच्या धोरणाबद्दल बोलताना, हा नियम 2008 मध्ये हंगामाच्या उद्घाटणापासून अस्तित्वात होता, परंतु शेवटी तो 2021 मध्ये रद्द करण्यात आला कारण तो कधीही वापरला गेला नाही. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, एमएस धोनी सीएसकेसाठी फक्त फ्रँचायझी क्रिकेट खेळला. यष्टीरक्षक फलंदाज गेल्या काही हंगामांपासून त्याच्या निवृत्तीबद्दल त्यानी सस्पेन्स कायम ठेवला आहे. IPL 2025 मध्ये धोनीचा सहभाग रिटेन्शन नियमांवर अवलंबून असेल. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी, धोनीने सीएसकेचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आणि त्याने आयपीएल कारकिर्दीवरही पडदा टाकण्याचा इशारा दिला. डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजी करूनही, एमएसडीने 220.54 च्या स्ट्राइक-रेटने आणि 53.66 च्या सरासरीने 161 धावा केल्या. बीसीसीआयने अद्याप आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या नियमांना शिक्कामोर्तब केलं नाही त्यामुळे धोनीला बीसीसीआयच्या निर्णयाची वाट बघवी लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img