26.5 C
New York

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचा गमतीदार टीझर प्रदर्शित

Published:

२००४ साली प्रदर्शित झालेला “नवरा माझा नवसाचा” (Navra Maza Navsacha 2) चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला होता. अजूनही हा चित्रपट तितक्याच उत्साहाने पहिला जातो. या चित्रपटाचा मोठा चाहता वर्ग आहे. या चित्रपटातील गाणी असो, किंवा डायलॉग त्यावर रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच ह्याचा पार्ट २ कधी येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होत. काही दिवसांपूर्वी नवरा माझा नवसाचा २,पहिलच गाणं प्रदर्शित झालं होत. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यानंतर आज (१५ ऑगस्ट) ला नवरा माझा नवसाचा २ ह्या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झालं. या टीझरमुळे पुन्हा एकदा नॉनस्टॉप कॉमेडीला सुरुवात होताना पाहायला मिळाली. असं कॅपशन देत सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा २ ह्या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेयर केलाय.

नवरा माझा नवसाचा २ ( Navra Maza Navsacha 2 ) हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटात आपल्याला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर, विजय पाटकर, गणेश पवार अशा सर्व दिग्गज मंडळींची कॉमेडी पाहयला मिळणार आहे.

सूरजला समजावण्याचा DP चा तिखट कोल्हापुरी अंदाज पाहिलात का?

या चित्रपटात मजेशीर कॉमेडी पाहयला मिळत आहे. भक्ती आणि वॅकी आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत आहेत. पण त्याचवेळी बाप्पांची मूर्ती हरवलयान भक्ती थोडी गोढळात असलेली पाहयला मिळत आहे. या प्रवासादरम्यान बरीच धमाल मौज मस्ती आपल्यला पाहायला मिळणार आहे.टीझरचा शेवट मात्र गणपती बापाच्या जयघोषात होत असून त्यानंतर बाप्पांची मूर्ती देखील त्यांना सापडते. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात ( Navra Maza Navsacha 2 ) बाप्पाची हरवलेली मूर्ती कशी सापडते? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img