15.6 C
New York

Ashok Tavhare : गुन्हेगारी भ्रष्टाचार विरोधात कवी लेखक अशोकराव टाव्हरे यांचे आंदोलन

Published:

रमेश औताडे, मुंबई

वाढलेली गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलिस चौकी, पतसंस्थेतील मनमानी कारभार, न्यायालयाचा अवमान तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, या सर्व प्रकरणी समाजसेवक कवी लेखक अशोकराव टाव्हरे (Ashok Tavhare) यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू करत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कनेरसर ता.खेड, पुणे येथील खेड तालुक्यात कनेरसर या सेझ क्षेत्रात चार वर्षात दोन ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा निर्घुण खुन, वारंवार ठेकेदारीतून स्पर्धा, भांडणे, मारामारी इतर गंभीर प्रकार होत असताना मी या प्रकरणी मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन याचिका प्रकरणी न्याय मागत असताना माझ्याच जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने जर या प्रकरणी योग्य ती दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा समाजसेवक कवी लेखक अशोकराव अशोकराव टाव्हरे यांनी यावेळी दिला.

तसेच मी दुसरी एक याचिका श्री यमाई पतसंस्था प्रकरणी उच्च न्यायालयात केली होती. लिक्विडेटर नेमल्यानंतर ११ वर्षांनी गुन्हा कसा दाखल झाला याचे स्पष्टीकरण मागितले आहे. परंतु मंचर पोलीस स्टेशनला तपास देणे व न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्र देणे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने मी न्याय मागत आहे .

ऑक्टोबर २०२२ मध्ये खेड पोलीस स्टेशनला तपास दिला होता. परंतु पुर्वीचे तपास अधिकारी यांनी नवीन तपास अधिकारी यांच्यावर दबाव आणुन तपास करू दिला नाही असा आरोप करत अशोकराव टाव्हरे यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img