15.6 C
New York

Sanjay Raut : सुपारी गँग वर्षा बंगल्यावर बसलीये; फोटो दाखवत राऊतांचा प्रहार

Published:

मुंबई

मातोश्रीवर वक्फ बोर्डाचा (Waqf Board Bill) प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली. हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सुपारी गँगचे लोक होते. (Sanjay Raut) ते लोक सोडून इतर सगळा मुस्लिम समाज आमच्याबरोबर आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, सुपारी गॅंग वर्षावर बलसलोली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

आजकाल मुंबईत सुपारीचा कार्यक्रम चालला आहे. दिल्लीतून सुपारी दिली जाते, मग गोष्टी घडतात. मातोश्रीच्या बाहेर वक्फ बोर्डाच्या मागणीसाठी असेच सुपारीबाज लोक आले होते. काहींनी पैसे देऊन आंदोलनासाठी या लोकांना पाठवलं होतं. वक्फ बोर्डासंबंधीचं विधेयक हे चर्चेसाठी आलेलं नाही. अजून चर्चा झाली नाही, कुणाची मतं कळली नाहीत. तेलगुदेसमने विरोध केला आहे. मातोश्रीच्या बाहेर हंगामा करण्यात आला. त्यातले अर्धे लोक गुन्हेगार होते. ही सुपारी कुणाची होती मी तुम्हाला दाखवतो. जे 10 ते 12 लोक मातोश्रीच्या बाहेर घोषणा देत होते ते सगळे मुख्यमंत्र्यांचे लोक होते. असं म्हणत संजय राऊत यांनी फोटो दाखवून थेट आरोप केले आहेत.

आज पत्रकारांसमोर राऊतांनी थेट फोटो दाखवले. आंदोलनात सामील असलेल्या लोकांची नावे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटो दाखवले. तसेच हे सर्व मुख्यमंत्री शिंदे यांचेच लोकं होते. वर्षा बांगला, मंत्रालय आणि ठाण्यात ही सुपारी गँग चालवली जाते. हे सर्व लोकं ठाण्यातील नव्हे तर ठाण्याबाहेरून आणलेले लोकं होते असा दावा राऊतांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करणारे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे लोकं होते. यातील काही वर्षा बंगल्यात राहतात, काही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासात राहतात. हे सर्व जण सुपारी गँगचे सदस्य होते. ठाण्यात देखील राडा करणारे याच गँगचे सदस्य आहेत. या सुपारी गँगचे सूत्रधार हे दिल्लीत बसलेले आहेत. अशा प्रकारे भाड्याचे लोकं आणून तमाशा केला जात आहे हे सर्व जनता पाहत आहे”.

संजय राऊत म्हणाले, सुपारीचे सर्व खेळ सध्या वर्षा बंगला, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आणि ठाण्यातून चालवले जातात. मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोकं पाठवली. शिंदेंचे संपूर्ण कुटुंबच सुपारीबाज आहे. ते सध्या सत्तेत आहेत. मात्र कधीतरी आम्ही सत्तेचे येऊ. आमच्या हाती जेव्हा सत्ता येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार? कोणत्या बिळात लपून बसणार?, अहमद शाह अब्दाली मराठी माणसांत भांडणे लावत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img