11 C
New York

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख मांडूळ असा केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे. तसं उद्धव ठाकरेंनी मी दिसतो, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे. तसं उद्धव ठाकरेंनी मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे त्यांना अजून हजम झालं नाही. त्यामुळं बसता-उठता, खाता-पिता मी त्यांना सर्वत्र दिसतो. स्वप्नातही मी त्यांना दिसतो, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार आज पडेल, उद्या पडेल असं ते सांगायचं. मात्र, आमचं सरकार मजबुतीने उभं आहे. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. तेच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेत आहेत. पोस्टर्स का लावत आहेत. विरोधकांचीभूमिका दुटप्पी आहे, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, होय, ही वस्तुस्थिती आहे. मलाही अडवण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, त्यांची कोंडी करणं हे मी समजू शकतो. मात्र, मी तर त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तरीही मला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला. मी यावर सविस्तर बोलेन, असं शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img