24.6 C
New York

Uddhav Thackeray Car Attack : मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Published:

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळफेक आणि शेणाचा मारा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या गाडीवर नारळ आणि शेणाचा मारा केल्यानंतर (Uddhav Thackeray Car Attack) मनसेचे जवळपास 44 कार्यकर्ते पसार झाले होते. यापैकी कोणीही अद्याप ठाणे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. राडा घालणाऱ्या मनसेच्या (MNS) 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवलं आहे. 

ठाण्याच्या गडकरी रंगायतनबाहेर राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केले होते. रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेल्या या महाराष्ट्र सैनिकांचा शोध पुन्हा सुरु केल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी आविनाथ जाधव यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असल्याचा आरोप आहे.  पोलिसांनी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल केले आहेत. यामध्ये 44 कार्यकर्त्यांवर भारतीय कलमानुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये 32 महिला तर 12 पुरुष यांचा समावेश आहे. 

मनसे कार्यकर्ता प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू, मनोज चव्हाण हे कार्यकर्ते आरोपी आहेत.  गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन सोडण्यातआल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर, ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणि गडकरी रंगायतन येथे राडा घालणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img