17.6 C
New York

Assembly Elections : ‘मविआ’च्या जागा वाटपावर बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचं (Assembly Elections) वेध लागलंय. एकीकडे सत्ताधारी भाजप (BJP), शिंदे गट, अजित पवार (Ajit Pawar) गट तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांचे राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आज नांदेड दौऱ्यावर होते. नांदेड दौऱ्यावर असताना बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपाबाबत मोठं विधान केलंय. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसला किती जागा मिळणार याबाबत त्यांना माध्यमांकडून विचारण्यात आलं. त्यावर थोरात यांनी थेट भाष्य केलंय.

बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हांला चांगलं यश मिळालं आहे. जनेतेने काँग्रेसला पसंती दिली असून आगामी विधानसभेत जागावाटपाबाबत आमच्यात अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत अजून काहीच ठरलं नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना थोरात यांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केलंय.

नांदेडमधील काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केलायं. भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आलीयं. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जनतेकडून आम्हाला घवघवीत यश मिळालं आहे. अशोक चव्हाण यांचं भाजपमध्ये जाणं लोकांना आवडलेलं नाही. त्यांना लोकं प्रतिसाद देत नसल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्तापर्यंत फक्त एकच बैठक झाली आहे. पुढील बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. सध्या जागावाटपांबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलायं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img