11.5 C
New York

Virat Kohli: वर्ल्डकप उंचावल्याची खुशी आणि विराटची अनुष्कासाठी खास पोस्ट !

Published:

Virat Kohli: टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर भारतीय संघाने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरून घेतलं. या विजयाचा जल्लोष कोट्यवधी भारतीयांनी केला. भारताचा आणि सर्वांचा आवडता खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अंतिम सामन्यात शानदार खेळी करत भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीने बायको अनुष्कासाठी (Anushka Sharma) खास पोस्ट करत कॅप्शनमध्ये प्रेम व्यक्त केलं आहे. कठीण काळात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी बायको अनुष्का हिला विजयाचं श्रेय देत विराटने तीच कौतुक केलं आहे. विराटने त्याच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबत सुंदर फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलंय की, तुझ्याशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. जितका माझा विजय आहे, तितकाच तुझाही विजय आहे…’ असं कॅप्शनमध्ये लिहत अनुष्काचे विराटने आभार व्यक्त केले आहेत.

Virat Kohli: बॉलीवूडमधली सर्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मोठ्या पडद्यापासून दूर जरी असली तरी मात्र अनुष्का सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनुष्का आणि विराट हे दोघे आयडियल, पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही नेहमीच एकमेकांवर व्यक्त होताना दिसतात, सोशल मीडियावरही एकमेकांबद्धल इंटरव्ह्यूमधून स्पष्ट जाणवलंय. आणि दोघे सर्वांसमोर ओपनली मान्यही करतात. विराटचा एखादा विजय असो किंवा पराभवाचा सामना केलेला असो, अनुष्का नेहमीच त्याला सपोर्ट करताना दिसते. तर अनुष्काचा नवीन प्रोजेक्ट असो, एखादी कोणतीतरी ॲड आली किंवा तिचा वाढदिवस असेल तर विराट सोशल मीडियावर तीच कौतुक करताना थकत नसतो. त्यामुळे त्यांचे चाहते असो, त्यांना पाहणारे विव्हर्स असो दोघांकडेही आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं.

पुण्यात नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

अनुष्काने केलं विराटचं कौतुक
Virat Kohli: आता सगळीकडे भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केल्यावरसुद्धा विराट कोहली आणि भारतीय संघाचं भरभरून कौतुक पाहायला मिळतंय. इंडियाच्या मॅचला बऱ्याच वेळा स्टेडिअममध्ये उपस्थित राहणारी अनुष्का, टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी आली नव्हती, पण जसं विजय मिळवल्यानंतर विराटने अनुष्काला व्हिडिओ कॉल करून तिच्याशी आणि मुलांशी संवाद केला. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर इंडिया टीमचे अभिनंदन करत पोस्ट लिहिली आहे आणि विराटला शानदान परफॉर्मन्ससाठी त्याचे भरभरून कौतुक करणारी तिची पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

विराटची अनुष्कासाठी खास पोस्ट
विराटनेसुद्धा अनुष्कासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. दोघांचाही हसरा फोटो शेअर करत, त्याने अनुष्कासाठी लिहिलंय की, ‘हा विजय तुझ्याशिवाय शक्य झाला नसता. तुझ्यामुळे मी नेहमी नम्र असतो, माझे पाय जमिनीवर राहण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. हा विजय, हे यश जितकं माझं आहे तितकंच तुझंसुद्धा आहे. थँक यू आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’ अशी पोस्ट लिहीत विराटने अनुष्काला टॅग केलं आहे.

अवघ्या ९ तासांत विराटने लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून लोकानी त्याच्यावर प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विराटच्या या पोस्टला ८० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून त्यावर हजार जणांनी या जोडीचं कौतुक करत प्रेम व्यक्त केलं आहे. सामन्यांमध्ये सामनावीर म्हणून निवड झाल्यांनतर विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img