बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा लेक आर्यन खान (Aaryan Khan) सध्या त्याच्या पहिल्या वेबसीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मुळे प्रकाशझोतात आला आहे. या सीरिजचा प्रीव्ह्यू नुकताच प्रदर्शित झाला असून, त्या खास कार्यक्रमाला शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब आणि कलाकार मंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावर आर्यनचे अनेक फोटो-व्हिडिओ व्हायरल होत असून, त्याच्या पदार्पणाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते.
आर्यन हा शाहरुख आणि गौरी खान (gauri Khan) यांचा मोठा मुलगा असून त्याने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून (Dhirubhai Ambani Internation School) शालेय शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शनमध्ये पदवी मिळवली. अभिनयाऐवजी दिग्दर्शन व व्यवसाय या क्षेत्रात करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.
2022 मध्ये त्याने आपल्या मित्रांसोबत D’YAVOL या स्ट्रीटवेअर ब्रँडची सुरुवात केली. त्याशिवाय प्रीमियम स्कॉच व्हिस्की ब्रँड D’YAVOL Inceptionही त्याच्या नावावर असून यात वडील शाहरुख खानही भागीदार आहेत.
आर्यनला महागड्या गाड्यांचा विशेष शौक असून त्याच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज GLS 350D, मर्सिडीज GLE 43 AMG कूप, BMW 730 LD आणि ऑडी A6 सारख्या लक्झरी कार्स आहेत.
रिपोर्टनुसार, सध्या आर्यन खानकडे तब्बल 80 कोटींची संपत्ती आहे. दिल्लीतील पंचशील पार्कमधील 37 कोटींच्या आलिशान बंगल्यापासून ते ब्रँड शूट्स आणि सोशल मीडिया मोहिमांतून होणाऱ्या कमाईपर्यंत आर्यनचे लाइफस्टाईल नेहमीच चर्चेत असते.