16.4 C
New York

Karan Kundra : करण कुंद्राचा डेटिंग ॲपवरील प्रोफाइल व्हायरल, अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण

Published:

टेलिव्हिजन जगतातील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे करण कुंद्रा ((karan kundra) आणि तेजस्वी प्रकाश (tejaswini Prakash). बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात सुरू झालेलं त्यांचं प्रेम आता चार वर्षांपासून रिलेशनशिपपर्यंत पोहोचलं आहे. लग्नाच्या चर्चांनी रंगत असतानाच अचानक करण कुंद्राचा प्रोफाइल एका डेटिंग ॲपवर दिसल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.

‘बंबल’ (bamble) या ॲपवर करणचा फोटो आणि त्याचं वय दाखवत असलेला स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की तेजस्वीसोबत असताना करण असं कसं करू शकतो?

या वादावर करण कुंद्राने अखेर मौन सोडलं. त्याने सांगितलं की, “माझं ‘बंबल’वर कोणतंही अकाऊंट नाही. अशा बनावट प्रोफाइल्स दर 6-8 महिन्यांनी समोर येतात. गेल्या काही वर्षांपासून हे सतत घडतंय. हा स्क्रीनशॉट जुना आहे, फेक आहे. माझ्या राहण्याच्या पत्त्याबाबतही चुकीची माहिती टाकलेली आहे. मी जलंधरमध्ये माझ्या कुटुंबासोबत राहतो, पण त्या प्रोफाइलमध्ये वेगळं ठिकाण दाखवलंय.”

चाहत्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करणने केला असला तरी या फोटोवर तेजस्वी प्रकाशने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच ही जोडी विकी जैनच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसली होती. तसेच, ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चेलाही तेजस्वीने स्वतः पुष्टी दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img