22.2 C
New York

Arjun Tendulkar : सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकरचा गुपचूप साखरपुडा; सारा तेंडुलकरच्या पोस्टमधून उलगडली जुन्या ओळखीची गोष्ट!

Published:

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या चर्चेत आहे. कारण त्याने नुकताच उद्योजक रवी घई (Ravi Ghai) यांची नात सानिया चंडोक हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. 13 ऑगस्ट रोजी हा समारंभ अगदी खासगी पद्धतीने पार पडला.

पण साखरपुड्यानंतर चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न अर्जुन आणि सानिया (Saniya) आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? याचे ठोस उत्तर मिळणे कठीण असले तरी सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून काही संकेत नक्कीच मिळतात.

10 जून रोजी साराने (Sara) दुबई ट्रिपचे फोटो शेअर केले होते, ज्यात ती आपल्या भावासोबत दिसत होती. त्याचबरोबर एका फोटोमध्ये सानिया चंडोकही होती. यावरून असा अंदाज लावला जात आहे की अर्जुनच्या दुबई प्रवासात सानिया देखील त्याच्यासोबत होती.

याशिवाय, 19 मार्च 2025 रोजी साराने सानियासोबतचे काही फोटो पोस्ट करत तिला ‘माय प्लस वन फॉरएव्हर’ अशी कॅप्शन दिली होती. अर्जुन, सारा आणि सानिया तिघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात आणि त्यांचे अनेक एकत्र फोटोही आहेत. म्हणजेच ही ओळख नवीन नसून आता तिला एका नव्या नात्याचा मुकुट मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img