सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांचा दबदबा वयाच्या ७४ व्या वर्षीही कमी झालेला नाही. त्यांच्या स्टाईल, डायलॉग डिलिव्हरी आणि एण्ट्रीमुळे प्रेक्षक आजही त्यांच्यावर तितकेच प्रेम करतात. अभिनयाची सुरुवात त्यांनी १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटातील छोट्या भूमिकेने केली. त्याआधी ते कंडक्टर म्हणून काम करत असत आणि त्यांना पहिल्या नोकरीत केवळ ७५० रुपये पगार मिळत होता.
आज ते तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक आहेत. सध्या ते चेन्नईच्या पॉईस गार्डन या उच्चभ्रू भागात राहतात, आणि त्यांच्या घराची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये आहे.
रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘कुली’ (Kuli)हे त्यांचे आणखी एक भव्य बजेट असलेले काम आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल ३५० कोटी रुपये असून, तो १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘कुली’चा बॉक्स ऑफिसवर थेट सामना होणार आहे ऋतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्या ४०० कोटी रुपयांच्या ‘वॉर 2’ (War 2) या चित्रपटाशी.