मालेगाव बॉम्बस्फोट मोठी अपडेट
2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. तपास यंत्रणेकडे आरोपींविरुद्ध पुरेसे ठोस पुरावे नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले. आता न्यायालयाने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याविरोधातील गंभीर आरोपांबाबत चौकशीचे आदेश दिले आहे.
कृषीखाते मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांची पहिली प्रतिक्रिया
कृषीखाते मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सर्वांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाचे काम सुरु, मंदिरात धुळीचे साम्राज्य
तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाचे काम सवानी कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू असून, हे काम कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय केले जात असल्यामुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंदिराच्या शिळांची कापणी उघड्यावरच सुरू असल्यामुळे संपूर्ण मंदिरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः देवीच्या यज्ञ मंडपाच्या बाजूलाच हे काम सुरू असल्यामुळे भाविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.