25.2 C
New York

Saiyaara : सैयारा पाहून लोक इतके का ढसाढसा रडतायत?

Published:

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सैयारा (Saiyaara) या बॉलिवूड चित्रपटाने तरुणांच्या भावना अक्षरशः ढवळून काढल्या आहेत. चित्रपटगृहात ढसाढसा रडणारे, मिठी मारणारे आणि अगदी बेशुद्ध होईपर्यंत भावना व्यक्त करणारे तरुण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या व्हिडीओंनी लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे प्रेमकथेचा शेवट सुखद असूनही, ही भावना एवढी प्रबळ का ठरत आहे?

काही जण या भावनिक उद्रेकाला “ड्रामेबाजी” म्हणून हिणवत आहेत, तर काहींना वाटतंय की ही तरुणाई आजही प्रेमाच्या नावाखाली खूप काही अनुभवते, जे समजून घेणं आवश्यक आहे. मात्र, यामागचं खरं कारण मानसशास्त्रात दडलं आहे.

दिल्लीतील एका प्रसिद्ध रुग्णालयातील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सांगतात की, या अश्रूंचं मूळ केवळ चित्रपटात नाही, तर प्रेक्षकांच्या मनात खोलवर लपलेल्या जखमांमध्ये आहे. “चित्रपटात जे काही घडतं, ते आपल्या मनाच्या अवचेतन पातळीवर काहीतरी हलवतं. विशेषतः जेव्हा स्क्रिनवर घडणारी कथा आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवाशी मिळती-जुळती असते, तेव्हा त्या आठवणी पुन्हा वर येतात आणि भावनिक उद्रेक घडतो,” असं त्या सांगतात.

विशेष म्हणजे, सैयारा मध्ये शेवट आनंददायी असला तरी, तो अनेक प्रेक्षकांसाठी एक वेदनेचा ट्रिगर ठरतोय. आपल्याला तसा शेवट का मिळाला नाही? आपल्यासाठी कोणी का थांबलं नाही? या प्रश्नांनी अंतर्मनात गोंधळ उडतो आणि त्यातून भावना उफाळून येतात. यामुळे अनेकदा आपलं दुःख, जे आपण वर्षानुवर्षे दडपून ठेवलेलं असतं, ते अशा कथांमधून अनायासच बाहेर पडतं.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, ही प्रतिक्रिया काही वेळा इतकी तीव्र असते की ती पॅनिक अटॅकसारखी देखील भासू शकते. अशावेळी समुपदेशनाची मदत घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण प्रश्न सैयाराचा नसतो, तर त्या वेदनांचा असतो, ज्या अदृश्यपणे आपल्याला सतावत असतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img