25.2 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

राज्य सरकार कडून तिर्थदर्शन यात्रेचा निधी न मिळाल्याने 1200 यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा स्थगित

– राज्य सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेचे 1 कोटी 86 लाख शासनाकडे थकीत…

– थकीत निधी न मिळाल्याने आयआरसीटीसी कडून आगामी यात्रा स्थगित….

– राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे 2024-25 या वर्षात 25 यात्रा आयआरसीटीसीने आयोजित केल्या होत्या, या यात्रेसाठी 1 कोटी 86 लाख 47 हजार 875 रुपयाचा खर्च झाला…

– तो निधी अद्याप शासनाकडून मिळाला नाही.

– नागपुरातून 27 जुलैला बाराशे यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठीरवांना होणार होते. त्यासाठी शासनाकडून कुठलीही परवानगी न मिळाल्याने बाराशे यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले

या चक्काजाम आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह 18 कार्यकर्त्यांवर अमरावतीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे…..

अमरावतीनागपूर महामार्ग रोखल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोडी निर्माण झाली होती आणि त्यामुळे गुन्हे दाखल झाले आहे.

आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

भंडाऱ्यात आज रेड अलर्ट, सर्व शाळांना सुट्टी, पावसाची रिपरिप सुरू

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला आहे

त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

तर काल सायंकाळ पासून सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली.

जिल्ह्यातील सातही तालुक्यात कुठं हलका तर, कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर पावसाचे रिपरिप सुरू झाली आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img