25.3 C
New York

Swachh Survekshan  : इंदूर आठव्यांदा ठरलं देशातील सर्वात स्वच्छ शहर, नवी मुंबई तिसऱ्या स्थानी; वाचा संपूर्ण यादी

Published:

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील (Swachh Survekshan)  सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर, गुजरातचे सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि नवी मुंबईने स्वच्छतेच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून 2017 पासून इंदूर सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. गुरुवारी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ चे निकाल जाहीर झाले.

यावेळी स्वच्छता सर्वेक्षणात सुपर लीग ५ श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या, ३ ते १० लाख, ५० हजार ते ३ लाख, २० ते ५० हजार आणि २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. ज्यात इंदूर पहिल्या, सुरत दुसऱ्या, नवी मुंबई तिसऱ्या तर, विजयवाडा शहराने चौथा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता सर्वेक्षणात २३ शहरांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळीही इंदूरला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या श्रेणीत नोएडाने सुपर स्वच्छ लीग जिंकली आहे. याशिवाय, चंदीगड दुसऱ्या, म्हैसूर तिसऱ्या, उज्जैन चौथ्या, गांधीनगर पाचव्या आणि गुंटूर सहाव्या क्रमांकावर आहे.

Swachh Survekshan  अन्य शहरांमध्ये कुणी मारली बाजी

५० हजार ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी सुपर क्लीन लीगमध्ये नवी दिल्लीने वर्चस्व गाजवले आहे. या श्रेणीत तिरुपती दुसऱ्या, अंबिकापूर तिसऱ्या आणि लोणावळा चौथ्या क्रमांकावर आहे. सुपर क्लीन लीग शहरात २० ते ५० हजार लोकसंख्येत विटा पहिल्या क्रमांकावर, सासवड दुसऱ्या क्रमांकावर, देवलानी परवारा तिसऱ्या क्रमांकावर आणि डुंगरपूर चौथ्या क्रमांकावर आहे. तर, २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचगणी पहिल्या क्रमांकावर, पाटण दुसऱ्या क्रमांकावर, पन्हाळा तिसऱ्या क्रमांकावर, विश्रामपूर चौथ्या क्रमांकावर आणि बुडनी पाचव्या क्रमांकावर आहे.

Swachh Survekshan  २०१७ पासून सतत नंबर वन

२०१७ पासून इंदूर सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इंदूरचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले होते की, जेव्हा इतर शहरे काहीतरी करण्याचा विचार करतात तेव्हा इंदूरने ते काम आधीच केलेले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत हे पूर्णपणे खरे ठरले आहे. इंदूरच्या जनसहभाग मॉडेलचे देशभर कौतुक केले जाते. परस्पर समन्वय आणि काहीतरी नवीन करण्याची आवड हेच इंदूरला इतर शहरांपेक्षा पुढे ठेवते हेच सलग आठव्यांदा स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलेल्या निकालावरून अधोरेखित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img