23.5 C
New York

Rahul Fazilpuria : गायक राहुल फाजिलपुरिया वर गुरुग्राममध्ये गोळीबार; जीवावर बेतलेला हल्ला थोडक्यात टळला!

Published:

हरियाणवी रॅपच्या दुनियेत आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूड रॅपर राहुल फाजिलपुरिया खरं नाव: राहुल यादव वर सोमवारी संध्याकाळी गुरुग्राममध्ये गोळीबार झाला. एसपीआर रोडवरील हा थरारक प्रकार त्याच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी 2 ते 3 गोळ्या झाडून केला, मात्र सुदैवाने या हल्ल्यात तो बचावला आणि घटनास्थळावरून सुरक्षित पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, गोळीबाराचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. हल्लेखोर फरार झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे, मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

राहुल फाजिलपुरिया हा हरियाणवी रॅप म्युझिकला बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात आणणारा महत्त्वाचा चेहरा मानला जातो. त्याचं सुप्रसिद्ध गाणं ‘कर गई चुल’ चित्रपट कपूर अँड सन्स हे सुपरहिट ठरलं होतं. त्याशिवाय ‘टू मेनी गर्ल्स’, ‘व्हिआयपी’, ‘जट लाइफ ठग लाइफ’, ‘पार्टी’ यांसारखी गाणी देखील युवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली.

10 एप्रिल 1990 रोजी जन्मलेला राहुल हा मूळचा गुरुग्राममधील फाजिलपूर गावाचा रहिवासी, त्यामुळे त्याने स्टेज नेम म्हणून ‘फाजिलपुरिया’ हे नाव घेतलं. बीटेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने स्वतःचा संगीतकार आणि रॅपर म्हणून प्रवास सुरू केला. लहानपणापासूनच त्याला गायन आणि अभिनयाची आवड होती. त्याची देसी स्टाइल आणि हटके लिरिक्स ही त्याची खास ओळख आहे.

राहुलने 2024 मध्ये गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून जननायक जनता पक्षाच्या (JJP) तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण भाजपचे मुकेश शर्मा यांनी 1.22 लाख मतांनी त्याचा पराभव केला. त्याचं नातं ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवशी खूप जवळचं मानलं जातं. 2023 मध्ये रेव्ह पार्टीतील सापाच्या विषासंबंधी प्रकरणातही त्याचं नाव चर्चेत आलं होतं.

इन्स्टाग्रामवर राहुलचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, त्याचा फॅन बेस प्रचंड आहे. या जीवघेण्या हल्ल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून, सोशल मीडियावर #StayStrongFazilpuria असा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img