24.3 C
New York

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरच भाकीत सत्यात उतरणार?

Published:

भारतीय क्रिकेट चाहत्यांनो, सेलिब्रेशनसाठी कमर कसून तयार राहा! कारण लॉर्ड्स टेस्ट भारताच्या खिशात जाणार, हे कुणीही नव्हे तर टीम इंडियाचा दमदार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर सांगतोय. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर त्याने इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर Sky Sports ला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत ठामपणे सांगितलं – “भारत लंचनंतर सामना संपवेल आणि विजयी होईल!”

हे वक्तव्य काही साधंसुधं नाही. कारण सुंदरने या टेस्टमध्ये आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवली आहे. त्याने दुसऱ्या डावात फक्त 22 धावा देत इंग्लंडचे 4 महत्त्वाचे फलंदाज गुंडाळे, आणि एक ऐतिहासिक टप्पाही गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या! सध्या त्याच्या नावावर एकूण 102 आंतरराष्ट्रीय बळी आहेत टेस्टमध्ये 30, वनडेत 24, आणि टी२० मध्ये 48 विकेट्स. त्यामुळे तो आता भारताकडून शतक पूर्ण करणारा 25 वा गोलंदाज बनला आहे.

विशेष म्हणजे, सुंदरने ज्या आत्मविश्वासाने भारताच्या विजयाची घोषणा केली, ती केवळ भावनेतून नाही, तर परिस्थिती पाहता खूप व्यावहारीक वाटते. इंग्लंडने भारतासमोर 193 धावांचं लक्ष्य दिलंय. चौथ्या दिवसाअखेर भारताने 4 विकेट गमावत 58 धावा केल्या होत्या – म्हणजे अजून 135 धावांची गरज आणि 6 विकेट हातात.

पाचवा दिवस पूर्ण उरलेला आहे, पण सुंदर म्हणतो, “आपण पूर्ण दिवस खेळणार नाही, आपला फोकस लवकर विजय मिळवण्यावर असेल.” रविंद्र जाडेजासोबत त्याची गोलंदाजीतील जोडी कमाल कामगिरी करत आहे आणि सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला आहे.

जर भारत हा सामना जिंकला, तर 5 कसोटींच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवेल आणि त्या निमित्ताने फॅन्ससाठी एक भव्य सेलिब्रेशनची संधी तयार होईल. तीही क्रिकेटच्या पवित्र लॉर्ड्स मैदानावर!

लॉर्ड्सवर टीम इंडियाचा इतिहास पाहिला तर, 2014 आणि 2021 मध्ये विजय मिळवलेला आहे. वॉशिंग्टन सुंदरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अनेक अप-डाऊन्समधून गेली, पण तो नेहमी शांतपणे कामगिरी करत राहिला. गोलंदाजीत तो ऑफस्पिनर असला तरी त्याचं लाइन-लेंथ, कंट्रोल आणि मॅच रीडिंग लाजवाब आहे. सुंदरचं आत्मविश्वासाने केलेलं भाकीत लवकरच सत्यात उतरण्याची शक्यता आहे. भारतीय संघ जिंकला, तर ही केवळ एक टेस्ट मॅचची नाही, तर आत्मविश्वासाची आणि जागतिक दर्जाच्या संघाला नमवण्याची घोषणा ठरेल!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img