28.2 C
New York

Bomb Diffuse : बॉमची माहिती मिळताच बॉम्ब डिफ्यूज कसा करतात?

Published:

देशात कुठेही बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होतो, पण या गंभीर प्रसंगी सगळ्यात आधी पोहोचणारे स्थानिक पोलीस आणि त्यानंतर या संकटाचा सामना करणारे खास प्रशिक्षित जवान म्हणजे एनएसजी कमांडो, ज्यांना आपण ‘ब्लॅक कॅट्स’ म्हणून ओळखतो. हे कमांडो कोणत्याही क्षणी तैनात होण्यासाठी तयार असतात, आणि ते फक्त संरक्षणासाठीच नव्हे तर जीव धोक्यात घालून देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी सज्ज असतात.

एनएसजी, म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स, ही भारताची सर्वोच्च स्तरावरील अति-विशेष कमांडो फोर्स आहे. गृह मंत्रालयाच्या अधीन असलेली ही फोर्स 1984 मध्ये स्थापन करण्यात आली. त्यांचा प्रमुख उद्देश आहे दहशतवाद, बंधकप्रसंग, हायजॅकिंग, आणि बॉम्बसदृश संकटांचा सामना करणे. या फोर्समध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण असून फक्त भारतीय सैन्य, केंद्रीय पोलीस दल आणि निमलष्करी दलांमधील अत्युच्च दर्जाचे जवानच यासाठी पात्र ठरतात.

एनएसजी कमांडोंना जे प्रशिक्षण दिलं जातं ते शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परिसीमा तपासणारं असतं. बॉम्ब डिफ्यूज करणे, अचूक नेमबाजी, शहरातील किंवा जंगलातील ऑपरेशन्स, गुप्त मोहीमा, उच्च दर्जाचे शस्त्रसज्जता आणि क्षणाक्षणाला निर्णय घेण्याची क्षमता यावर त्यांचं प्रशिक्षण केंद्रित असतं.

‘ब्लॅक कॅट्स’ हे नाव त्यांना त्यांच्या काळ्या ड्रेसमुळे मिळालं असलं तरी, त्यांच्या धाडसी मोहिमांमुळे हा एक भयप्रद आणि आदराचा शब्द बनलाय. त्यांच्या नावानं अनेक दहशतवादी थरथर कापतात. केवळ बॉम्ब निकामी करणे एवढंच नाही, तर राष्ट्रपती, पंतप्रधान, आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देणे, हायजॅक झालेल्या विमानात घुसून बंदींची सुटका करणे, किंवा एखाद्या गुप्त ठिकाणी दहशतवादी अड्ड्यावर हल्ला करणे – अशा प्रत्येक क्षेत्रात ते अग्रगण्य आहेत.

भारताकडे मार्कोस, गर्व्ह आणि पॅरा स्पेशल फोर्सेससारख्या उच्च दर्जाच्या इतरही कमांडो युनिट्स आहेत, पण बॉम्ब संबंधित आणि आतंकवादी नियंत्रणाच्या अत्युच्च कार्यात एनएसजीला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं.

‘ब्लॅक कॅट्स’ म्हणजे केवळ काळ्या पोशाखातील जवान नव्हे, तर ते राष्ट्रासाठी स्वतःला झोकून देणारे खरे वीर योद्धे आहेत. म्हणूनच, जेव्हा जेव्हा कुठे एनएसजी कमांडोंचे नाव ऐकू येईल, तेव्हा लक्षात ठेवा की ही टीम संकट टाळत नाही, तर त्याच्याशी तोंड देऊन देश सुरक्षित ठेवते!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img