28.2 C
New York

Amitabh Bachchan :”अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं म्हणजे अभिनयाच्या व्हायरसचा संसर्ग किरण कुमार यांनी उघड केला खास अनुभव!”

Published:

बॉलिवूडमधील बहुतेक सर्वच कलाकारांना ज्यांच्यासोबत एकदा तरी काम करायचं स्वप्न असतं, ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. बिग बी हे केवळ एक नाव नाही, तर एक असा अनुभव आहे, जो कलाकारांच्या मनात आदर, प्रेरणा आणि भारावलेपणाची भावना निर्माण करतो. शाहरुख खानपासून ते अनेक नवोदितांपर्यंत प्रत्येकाने त्यांना आपला आदर्श मानले आहे.

याचप्रमाणे अनुभवी अभिनेते किरण कुमार (Kiran Kumar) यांनी देखील त्यांच्या अनुभवातून अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचं वेगळंच रूप जगासमोर मांडलं आहे. एका पॉडकास्टमधून बोलताना त्यांनी सांगितलं की अमिताभ यांच्यासोबत काम करणं म्हणजे अभिनयाच्या ‘व्हायरस’चा संसर्ग होणं! हे ऐकून जरी धक्का बसला तरी त्यामागे दडलेलं उदाहरण प्रेरणादायक आहे. किरण कुमार म्हणाले की बच्चनसाहेबांचा अभिनय आणि त्यांची मेहनत इतकी प्रभावी असते की ती त्यांच्या सहकलाकारांच्या नसानसांत शिरते. एकदा का तुम्ही त्यांच्या अभिनयाच्या प्रभावात आलात, की मग त्यातून बाहेर येणं अवघड जातं.

ते पुढे म्हणाले, “अमिताभ बच्चन हे इतके परिपूर्ण आणि समर्पित कलाकार आहेत की, त्यांच्या प्रत्येक हालचाली, संवादफेक आणि कृतीत एक प्रकारचं अभ्यासू परिश्रम दिसून येतं. विशेष म्हणजे ते सहकलाकारांकडून हीच तंत्रशुद्धता आणि समर्पण अनायासेच बाहेर काढतात.”

किरण कुमार यांनी त्यांच्या चित्रपटातील एका किस्स्याचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की एका दृश्यात त्यांना अमिताभ यांना ठोसे मारायचे होते. बरेच कलाकार खलनायकांकडून मार खाल्ल्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत, पण अमिताभ प्रत्येक ठोश्यावर प्रतिक्रीया देत होते – ते अचूक वेळ साधून २ फूट मागे सरकत असत. अशा सजीव आणि वास्तवदर्शी अभिनयामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

त्यांनी हेही स्पष्ट केलं की अमिताभ यांच्याशी संवाद साधायचा असेल, तर तो त्यांच्या वेळेनुसारच होतो – म्हणजेच ते फक्त त्यांना वाटेल तेव्हाच स्वतःहून संवाद साधतात. पण एकदा का संवाद सुरू झाला, की मग कोणत्याही विषयावर, अगदी राजकारण, साहित्य, विज्ञान किंवा चित्रपट – त्यांच्या ज्ञानाचा आवाका पाहून कोणीही थक्क होतो.

या अनुभवातून स्पष्ट होतं की अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास असतो. त्यांचा शिस्तबद्ध, अभ्यासू आणि सौम्य स्वभाव इतर कलाकारांनाही आपल्या कामात अधिकाधिक परिपूर्णता आणण्यासाठी प्रवृत्त करतो. किरण कुमार यांचं हे वक्तव्य फक्त त्यांचं अनुभव सांगत नाही, तर अमिताभ बच्चन या व्यक्तिमत्त्वाचा अद्वितीय प्रकाशझोतही उलगडतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img