24.3 C
New York

Amir Khan : मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा गायकीत?

Published:

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला एका हटके भूमिकेत येतोय! ‘सितारे जमीन पर’ नंतर काही काळ अभिनयापासून दूर राहिलेल्या आमिरने आता एक नवीन आणि हलकाफुलका कॉमेडी चित्रपट स्वीकारला आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात तो केवळ अभिनयच नाही, तर गायनाचीही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणार आहे.

आपल्याला आठवतंय का? गुलाम या चित्रपटातील “आती क्या खंडाला?” हे गाणं ज्यात आमिरने स्वतः गायलेलं होतं आणि ते सुपरहिट ठरलं होतं. त्या क्षणानंतर तब्बल २७ वर्षांनी आमिर पुन्हा माइक हातात घेणार आहे. मात्र यावेळी मजा म्हणून नव्हे, तर प्रोफेशनल गायनासाठी तो कसून मेहनत घेत आहे. प्रसिद्ध लोकगायिका सुचेता भट्टाचार्य यांच्याकडून तो खास गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. तो म्हणतो, “मी आता फक्त अभिनेता नाही, तर एक प्रशिक्षित गायक होण्याचा प्रयत्न करतोय.”

आमिरने खुलासा केला की, या चित्रपटाचं अजून नाव ठरलेलं नाही. मात्र त्याची थीम बासु चटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमासारखी असेल म्हणजेच हलकी-फुलकी, कुटुंबवत्सल आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारी. “या चित्रपटात कुणाचाही मृत्यू नाही, ना खलनायक – फक्त सकारात्मकता आणि माणुसकी!” असं आमिरने नमूद केलं.

या कॉमेडी चित्रपटात आमिरची भूमिका फार मोठी नसली, तरी दोन महत्त्वाची गाणी तो स्वतः गाणार आहे. “आता गाणं हे माझं नव्याने साकारलेलं स्वप्न आहे. अभिनयाप्रमाणेच संगीतातही परफेक्शन पाहिजे, आणि त्यासाठी मी रियाज सुरू केलाय,” असं आमिरने सांगितलं.

‘सितारे जमीन पर’नंतर आमिरच्या पुढील काही प्रोजेक्ट्सची यादी देखील भन्नाट आहे: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटात एक खास छोटी भूमिका असेल. राजकुमार हिरानींसोबत ‘दादासाहेब फाळके’ बायोपिक – एक ऐतिहासिक आणि भावनिक कथा या बीओपीकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबत एक सुपरहिरो फिल्म ज्यात एक अ‍ॅक्शन आणि तंत्रज्ञानाचा मेळ असलेली कथा सादर होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img