26.2 C
New York

Tabu spoke Marathi in Filmfare Awards Marathi 2025 : तब्बूने शुद्ध मराठीतून संवाद साधल्यामुळे नेटकऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव

Published:

नुकताच पार पडलेला फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2025 चा सोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी नव्हे तर संपूर्ण इंडस्ट्रीसाठी खास ठरला. या सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते, पण सर्वात जास्त लक्ष वेधलं अभिनेत्री तब्बूच्या उपस्थितीनं. तब्बूने आपल्या साध्या पण सळसळत्या भाषणाने आणि मराठीतून व्यक्त होऊन संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट उडवला.

तब्बूने मंचावरून “नमस्कार… मला खूप आनंद होतोय. तुमच्या प्रेमासाठी आणि या सन्मानासाठी मनापासून धन्यवाद,” असं सांगत, आपल्या करिअरमधील एका विशेष भूमिकेसाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे नाव घेतले. ती म्हणाली, “मी हे पुरस्कार अशा व्यक्तीला अर्पण करते, ज्यांनी मला माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा दिला.” यानंतर तिने मांजरेकर यांना हाक मारून स्टेजवर बोलावले आणि सर्वांच्या समोर त्यांना मिठी मारली. हा हृदयस्पर्शी क्षण पाहताच, प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

फिल्मफेअरने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केल्यावर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, तब्बूने शुद्ध मराठीतून बोलल्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक मराठी चाहत्यांनी तिच्या भाषेतील सहजतेबद्दल आणि नम्रतेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्येही तब्बूचा दबदबा

सिनेमाच्या आघाडीवर बोलायचं झालं, तर तब्बू सध्या अक्षय कुमारसोबत ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून त्यात परेश रावल यांचीही दमदार उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. हेरा फेरी, गरम मसाला, भूल भुलैया यांसारख्या हिट चित्रपटांनंतर अक्षय-प्रियदर्शन ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर काहीतरी हटके घेऊन येणार आहे.

तब्बूची अलीकडील काही ठळक सिनेमे म्हणजे – ‘भोला’, ‘दृश्यम 2’, ‘भूल भुलैया 2’, ‘कुट्टे’, ‘गुप्ता’, ‘क्रू’ आणि ‘औरों में कहां दम था’ – या सर्व चित्रपटांमध्ये तिची भूमिकाच तिच्या अभिनयक्षमतेला न्याय देणारी ठरली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img