नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनीत बहुचर्चित मेगा प्रोजेक्ट ‘रामायण’ सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येताच चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. मात्र आता एक नवी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल – कारण या चित्रपटात साऊथ सुपरस्टार यश फक्त 15 मिनिटांसाठीच झळकणार आहे!
होय, ‘टेली चक्कर’च्या माहितीनुसार, यशचा रावण म्हणून स्क्रीनवरचा वावर पहिल्या भागात केवळ 15 मिनिटांचा असेल. आणि यासाठी त्याला 100 कोटींचं मानधन दिलं जात आहे पहिल्या भागासाठी 50 कोटी आणि दुसऱ्या भागासाठी 50 कोटी! इतक्या कमी वेळासाठी इतकी मोठी रक्कम मिळणं, हेच यशच्या स्टार पॉवरचं मोठं उदाहरण आहे.
हा ‘रामायण’ प्रोजेक्ट दोन भागांत साकारला जाणार आहे. पहिल्या भागात रावणाच्या उगमाची झलक आणि राम-रावण संघर्षाची तयारी दिसेल, तर दुसऱ्या भागात रावणाचं संपूर्ण वर्चस्व आणि राम-रावण युद्धाचा क्लायमॅक्स असेल.
यश फक्त 15 मिनिटांसाठीच दिसणार असल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांना वाटतं की एवढा मोठा स्टार फक्त काही मिनिटांसाठी कसा काय? तर काही चाहत्यांना वाटतं की यशचा लूक आणि स्क्रीन प्रेझेन्स इतका दमदार असेल की ते 15 मिनिटं देखील पुरेसे ठरणार आहेत!
सध्या ही बातमी ‘अफवा’ आहे की ‘अधिकारिक माहिती’, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. नितेश तिवारी किंवा निर्मात्यांनी यावर काही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.