21.7 C
New York

Jurassic World : रिबर्थ चा जागतिक जलवा! स्कारलेट जोहानसनने रचला इतिहास, भारतातही गाठली दमदार मजल

Published:

डायनासोरच्या थरारक जगात पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलेली ‘ज्युरासिक वर्ल्ड (Jurassic World): रिबर्थ’ (Rebirth) ही सायन्स-फिक्शन थ्रिलर फिल्म सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आग लावत आहे. 2 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या आठ दिवसांत जागतिक पातळीवर 349 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 2989 कोटी रुपयांची तुफान कमाई केली आहे.

या चित्रपटात जोरा बेनेट या जबरदस्त भूमिकेत झळकलेली स्कारलेट जोहानसन हिने आता हॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनण्याचा मान पटकावला आहे. तिच्या आतापर्यंतच्या केवळ 36 चित्रपटांनी मिळून तब्बल 14.8 अब्ज डॉलर कमावले आहेत. विशेष म्हणजे, ही कमाई मार्व्हलचे दिग्गज कलाकार सॅम्युएल एल. जॅक्सन आणि रॉबर्ट डाऊनी जूनियर यांच्यापेक्षाही अधिक आहे.
‘अ‍ॅव्हेंजर्स (Avengers)’ फ्रँचायझीतील भूमिकांमुळेच तिच्या कमाईत 8.7 अब्ज डॉलरचा वाटा आहे.

“ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ” ची कथा:

दिग्दर्शक गेरेथ एडवर्ड्स (Gareth Edwards) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्कारलेट जोहानसनची जोरा बेनेट ही व्यक्तिरेखा तीन भव्य डायनासोरांचे जनुकीय नमुने मिळवण्यासाठी एक धोकादायक मिशन पार पाडताना दाखवली आहे. नेहमीप्रमाणे ज्युरासिक मालिकेत सुरुवात शांत व भव्य असते, पण नंतर अनपेक्षित घटनांनी भरलेला थरार सुरू होतो. या चित्रपटातही हाच रोमांच जिवंत केला गेलाय, पण यावेळी सायंटिफिक डीएनए मिशनच्या पार्श्वभूमीवर अधिक वेगळ्या पद्धतीनं!

भारतातली झपाट्याने वाढती कमाई:

भारतामध्ये सुद्धा या सिनेमाने केवळ 6 दिवसांत 57.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवत आपली ताकद दाखवून दिली आहे. देशात हे आकडे पाहता, ‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ 100 कोटींच्या कलेक्शनकडे वेगानं वाटचाल करत आहे. याच दिवशी रिलीज झालेला बॉलिवूड चित्रपट ‘मेट्रो… इन दिनों’ मात्र फारशी कमाई करू शकलेला नाही.

बजेटच्या दुप्पट कमाईचा टप्पा:

सुमारे 1541 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने केवळ आठ दिवसांतच आपलं बजेट दुप्पट करण्याचा टप्पा पार केला आहे. येत्या काही दिवसांत हे कलेक्शन आणखी विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ हा केवळ एक साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलर नसून, तो ज्युरासिक फ्रँचायझीचा पुनर्जन्म असल्यासारखा भासतो. स्कारलेट जोहानसनच्या दमदार अभिनयासह, डायनासोरच्या नव्या जगातली सफर आता जगभरातील प्रेक्षक अनुभवत आहेत आणि त्यांचं हे प्रेम बॉक्स ऑफिसवर स्पष्ट दिसतंय!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img