24.7 C
New York

Shikhar Paharia : अस्मिता साजरी करा, शस्त्र नको… शिखर पहाडियाने व्यक्त केलं समंजस आणि भावनिक मत!

Published:

महाराष्ट्रात सध्या मराठी भाषेच्या अस्मितेवरून पेटलेला वाद नवनवीन वळण घेत आहे. ठाकरे बंधूंनी म्हणजेच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषेच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेतली असतानाच आता राजकारण आणि ग्लॅमर वर्ल्डशी संबंधित एक नव्या पिढीचा चेहरा पुढे आला आहे तो म्हणजे शिखर पहाडिया (Shikhar Paharia).

शिखर पहाडिया हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushil Kumar Shinde) यांचा नातू असून, सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतच्या (Janhvi Kapoor) नात्यामुळे तो चर्चेत आहे. मात्र यावेळी त्याचं चर्चेत येण्याचं कारण आहे त्याने मराठी भाषेविषयी व्यक्त केलेलं समंजस आणि भावनिक मत.

त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक सडेतोड आणि विचारशील पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, “मराठी अस्मिता ही सहभागाने उजळू द्या, धमक्यांनी नव्हे. ही भाषा साजरी करत जपा, ती कोणावर लादू नका.”

शिखरचं बालपण सोलापुरात गेल्याने त्याने मराठी संस्कृती आणि भाषेचं महत्त्व अनुभवलेलं आहे. तो लिहितो “भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नसून ती संस्कृती, इतिहास आणि अभिमान आहे. आपण कुठेही राहिलो, कुठलीही भाषा बोललो तरी त्यात अभिमान असावा, पण गर्व आणि द्वेष नव्हे.”

त्याच्या मते, “जर सोलापुरातील कुणी दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नईला जातं आणि तिथे त्याच्या भाषेला अपमानित केलं गेलं, तर काय होईल? म्हणूनच भाषिक अस्मिता हिंसेनं नव्हे तर सहभावानं जपली पाहिजे.”

शिखरच्या ह्या विचारमंथनाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जान्हवी कपूरनेही त्याच्या पोस्टला आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत पाठिंबा दर्शवला. अनेक नेटिझन्सनीही त्याच्या संतुलित भूमिकेचं कौतुक केलं आहे.

शेवटी, शिखर म्हणतो, “मराठी भाषा टिकवायची असेल, तर ती भीतीच्या नव्हे तर अभिमानाच्या आणि प्रेमाच्या मुळेच टिकेल. ही भाषा शस्त्र नाही, ती साजरी करण्याची आहे.”

या वादाच्या पार्श्वभूमीवर शिखर पहाडियाचं हे मत एक सकारात्मक, शांत आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडतं. जिथे मराठी भाषा जपण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसावर आहे, तिथे ती इतर भाषिकांशी युद्ध न करता, त्यांच्या सहभागातून समृद्ध व्हायला हवी हेच त्याचं मोलाचं आणि थेट म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img