27 C
New York

ED Probes : हैदराबादमध्ये ईडीकडून 29 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल

Published:

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. (ED Probes) ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप्सना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामध्ये दिग्गज अभिनेता प्रकाश राज, राणा दग्गुबाती, मंचू लक्ष्मी, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणिता सुभाष, एंकर श्रीमुखी, श्यामला, यूट्यूबर हर्षा साई, बय्या सनी यादव यांच्यासह अन्य लोक आहेत. सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मियापूर येथील व्यापारी फणिंद्र शर्मा यांनी एक तक्रार दाखल केली होती. यात म्हटले होते की अनेक युवक आणि सर्वसामान्य नागरिक सट्टेबाजीच्या अॅप्समध्ये पैसे गुंतवत आहेत. या अॅप्सचे प्रमोशन चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींकडून केले जात आहे. हे अॅप मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक संकटात टाकत आहेत. यानंतर सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी एफआयआर दाखल केला होता. तेलंगाणा गेमिंग अॅक्ट आणि सूचना प्रौद्योगिकी अधिनियमांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. ईडीने आता मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे.

या बेकायदेशीर अॅप्सचा प्रचार करण्यासाठी या लोकांना मिळालेले पैसे, आर्थिक देवाणघेवाण आणि कर रेकॉर्डसची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अॅप्समध्ये हजारो कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी अभिनेता विजय देवरकोंडाच्या टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी फक्त कौशल्य आधारीत गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चं प्रमोशन केलं होतं, जे 2023 मध्येचं संपलं आहे. अभिनेते प्रकाश राज म्हणाले, मी 2016 मध्ये एका अॅपचा प्रचार केला होता. नंतर मला यात चुकीचं वाटलं त्यानंतर मी यापासून दूर झालो.

राणा दग्गुबातीने सांगितलं की त्यानं जाहिरात करताना कायद्याचं पालन केलं होतं. दरम्यान, या प्रकरणाने तेलुगू चित्रपटसृष्टीत खळबळ उडाल आहे. सध्या याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाल्याने सेलिब्रिटी मंडळींना दंड आण कायदेशीर कारवाईचा धोका वाढला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img