मीरारोड-भाईंदर परिसरात अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मंगळवारी (८ जुलै) मीरा-भाईंदरमध्ये मराठी सन्मानासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मोर्चास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनसेच्या नेत्यांना अडवलं आणि मोर्च्याच्या पूर्वसंध्येला दडपशाही सुरू केली.
या कारवाईचा सर्वात मोठा परिणाम मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर झाला. पोलिसांनी पहाटे तब्बल साडेतीन वाजता त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. जाधव यांना पूर्वीच नोटीस बजावली गेली होती, मात्र त्यांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार सोडला नव्हता. त्यांनी मराठी जनतेला मोठ्या संख्येने एकत्र यावे, असं खुले आवाहन केलं होतं.
सध्या अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर मनसे नेते प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठाण्यातील या कारवाईविरोधात थेट खेड तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, “शासन दबावतंत्र वापरत आहे, पण आम्ही झुकणार नाही. आमचे नेतृत्व अटकेत असताना आम्ही शांत बसणार नाही.”
याच पार्श्वभूमीवर वसई-विरार परिसरात देखील मोठी हालचाल झाली आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून घरातून उचलून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आलं आहे. यात प्रमुख नावं पुढे येतात:
जयेंद्र पाटील – पालघर लोकसभा अध्यक्ष
प्रफुल्ल पाटील – माजी नगरसेवक, शहर सचिव
राकेश वैती – वसई शहर संघटक
प्रवीण भोईर – शहर अध्यक्ष
विनोद मोरे – विरार शहराध्यक्ष
संजय मेहरा – नालासोपारा उपशहराध्यक्ष
दिलीप नेवाळे – नालासोपारा विभागप्रमुख
कल्पेश रायकर, पांडुरंग लोखंडे – वाहतूक सेना अध्यक्ष
या सर्वांना नालासोपारा, विरार, नायगाव, वालीव आदी पोलीस ठाण्यांमध्ये अडवून ठेवण्यात आले आहे.
मोर्चाच्या आधीच सोशल मीडियावर मराठी जनतेत प्रचंड उत्साह होता. मनसेने ‘मराठी माणसाला नजरेत घालण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मागे हटणार नाही,’ असं जाहीर केलं होतं. या संपूर्ण कारवाईमुळे सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर