24.5 C
New York

Hindustani Bhau Warns Raj Thackeray : “मराठीचा माज ठेवा, पण हिंदूंचं ऐक्य विसरू नका… हिंदुस्थानी भाऊंचं राज ठाकरेंना थेट भावनिक आवाहन

Published:

सध्या महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारने नुकताच एक जीआर (शासकीय आदेश) काढून शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून एकत्र न दिसलेले ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एका व्यासपीठावर एकत्र आले, आणि त्यांनी हा जीआर मागे घेण्याची भूमिका घेतली. परिणामी, सरकारनं हा जीआर मागे घेतला आणि वरळीत एक भव्य विजयी मेळावाही पार पडला.

पण या पार्श्वभूमीवरच एक धक्कादायक घटना समोर आली – मराठी बोलत नसल्याच्या कारणावरून एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेमुळे राजकीय वातावरण आणखी पेटलं, आणि अनेकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

याच विषयावर सोशल मीडियावर ओळख मिळवलेले ‘हिंदुस्थानी भाऊ’ यांनी एक थेट व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जाहीरपणे संबोधित केलं आणि आपली नाराजी व्यक्त केली.

“जय महाराष्ट्र! साहेब, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. इथे मराठी भाषा केवळ अभिमान नाही, तर माज आहे. पण त्या माजाच्या नावाखाली जर इथं आलेल्या इतर हिंदू बांधवांना मारलं जात असेल, तर तो माज चुकीचा ठरेल.” त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठी शिकवणं आवश्यकच आहे, आणि त्यासाठी राज्य सरकार, मनसेने प्रयत्न करावेत. पण याच मराठीच्या नावावर गरीब लोकांवर हात उचलणं, केवळ ते इतर राज्यांतून आले म्हणून, ही अतिरेकी प्रतिक्रिया असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. हिंदुस्थानी भाऊ पुढे म्हणाले “आज मराठी माणूससुद्धा शिक्षणासाठी, रोजगारासाठी गुजरात, कर्नाटक, दिल्ली, बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांत जातो. जर तिथं त्यांना भाषेच्या नावावर मारलं, अपमानित केलं, तर काय वाटेल?” “साहेब, मारणं खूप सोपं आहे, पण सर्व हिंदूंना एकत्र आणणं कठीण आहे. ते काम करा. कारण बाळासाहेब ठाकरे (Balasahebh Thackeray) यांचं प्रतिबिंब लोक आजही तुमच्यात पाहतात.”

या व्हिडिओमुळे एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे म्हणजे “मराठी अस्मिता जपताना आपण इतर भाषिकांचा द्वेष तर करत नाही ना?”, हा प्रश्न आता जनतेसमोर आहे. भाषेचा अभिमान बाळगणं योग्यच आहे, पण तो अंध राष्ट्रवाद किंवा स्थानिकत्वाच्या नावावर हिंसाचारात बदलला, तर ते आपल्याच महाराष्ट्राच्या संस्कृतीविरुद्ध जाईल.

मराठी अभिमानाचं रूपांतर जर द्वेषात होत असेल, तर समाजात तेवढाच दुभंग वाढतो. हिंदुस्थानी भाऊ यांचं हे आवाहन केवळ राज ठाकरे यांना नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला एक विचार देऊन गेलं आहे “भाषेवर प्रेम ठेवा, पण माणुसकीवर नाहीसा होणारा विश्वास पुन्हा जागवायला विसरू नका.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img