19 C
New York

Pimpari : पिंपरी पेंढार येथे भरदिवसा साडेसहा तोळे सोन्याची चोरी

Published:

पिंपरी पेंढार ता.जुन्नर येथील गटवाडी येथे भरदिवसा साडेसहा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याने पिंपरी पेंढार आणि परिसरात खळबळ उडाली आहे. सदर चोरीची घटना मंगळवारी दि.२४ रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेढार गावच्या हद्दीत गटवाडी येथे घडली असून, याबाबत अमित दत्तात्रय कुटे  यांनी ओतूर पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून ओतूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,अमित कुटे यांना मंगळवारी पिंपरीपेंढार गटवाडी येथील रहात्या घरी चोरी झाल्याचे फोनवरून समजल्यावर,त्यांनी घरी जाऊन पाहिले असता, बेडरूम मधील कपाटातील साहित्य दागिण्यांचे रिकामे बॉक्स बेडवर इतरत्र अस्ताव्यस्त टाकलेले दिसले.

चोरीच्या घटनेवेळी शेजारी राहणारे निखील मस्करे हे अंघोळ करत असताना,त्यांना बाथरूमच्या खिडकीतुन कुटे यांच्या घराच्या अंगणात एक काळ्या रंगाची नविन युनिकॉर्न मोटार सायकल चालू स्थितीत उभी असलेली व एक पांढऱ्या रंगाचा टि-शर्ट घातलेली, तोंडाला लाल रंगाचा मास्क असलेली व्यक्ती कुटे यांच्या घरात दोन ते तीन वेळा आत बाहेर ये-जा करत असलेली दिसली, त्यामुळे निखिल यांना त्या व्यक्तीचा संशय आल्याने ते पटकन कुटे यांच्या घराच्या दरवाजा जवळ गेले असता, यूनिकॉर्न मोटार सायकलवर तिघेजण ट्रिपलसिट बसून हायवे रोडचे दिशेने वेगात निघून गेले.त्यावेळी त्यांनी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाचे अंगात पांढरे रंगाचा फुल बाहीचा शर्ट व तोंडाला काळे रंगाचे मास्क असल्याचे पाहीले. मला त्यांचा संशय येत असल्याने,त्यांनी घराचे बाजुला काम करत असलेल्या आज्जीला तुमच्या घरी कोणी पाहुणे आले होते का ? असे विचारल्यानंतर आज्जी म्हणाल्या की, मी मोटार सायकल वेगात जाताना पाहीली, परंतु आमच्याकडे कोणीही पाहुणे आले नव्हते.त्यानंतर घरात जावून पाहीले असता, घरातील साहीत्य अस्ताव्यस्त पांगलेले दिसले.या चोरीत कुटे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले

एक लाख ५ हजार रूपये किमतीचे तीन तोळ्याचे मणी मंगळसुत्र,एक लाख ५ हजार रूपये किमतीचा तीन तोळ्याचा राणीहार १७ हजार ५०० रूपयांचे  अर्ध्या तोळा वजनाचे  सोन्याचे वाटीमणी,३ हजार ५०० रूपये किमतीचे अर्धा ग्रॅमचे पानाचे आकाराचे छोटे पेंडंट आणि एक हजार रूपयांची रोकड असा मिळून एकूण दोन लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे.पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img