30.8 C
New York

Jasmin Dhunna : ‘Veerana चित्रपटातील ‘त्या’ खलनायिकेच्या अजानक गायब होण्याचे सत्य काय?

Published:

बॉलीवूड असा एक मायाजाळ आहे जिथे प्रत्येकजण मेहनतीने स्वप्नपूर्ण करण्यासाठी येत असत पण काहींना नशिबाची सात मिळते तर काहींना यशाच्या अर्ध्या शिखरावर स्वप्न विसरावं लागत. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलीवूडमध्ये करिअर घडवला आणि त्यांचा मधूनच गायब होणं एक रहस्यमय बनलं. तुम्हाला माहिती असेल १९८८ च्या काळात एक हॉरर चित्रपट आला आणि त्या चित्रपटाने बॉलीवूडबरोबर प्रेक्षकांचीही झोप उढवली .1988 साली रिलीज झालेल्या वीराना या हॉरर सिनेमातून रातोरात स्टार बनली ती म्हणजे जैस्मिन धुन्ना! जैस्मिन धुन्ना 1980 च्या दशकातल्या एक रहस्यमयी अभिनेत्री होती. तिने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 1979 साली सरकारी मेहमान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने डिव्होर्स 1984 आणि हातिम ताई (1990) मध्ये छोट्या भूमिका केल्या. पण खरी प्रसिद्धी मिळाली ती वीराना हॉरर चित्रपटातून या चित्रपटात तिने एका भयानक चुडेलीची भूमिका साकारली, जी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

वीराना हा रामसे ब्रदर्स यांचा एक कल्ट क्लासिक हॉरर चित्रपट आहे,. हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला होता, पण त्याने बॉक्स ऑफिसवर 1.5 कोटी रुपये कमावले, जे त्या काळात मोठी गोष्ट होती!

वीराना मध्ये जैस्मिनने एका तरुणीची भूमिका साकारली आहे, जी निकिताच्या ताब्यात येते. तिच्या मोहक सौंदर्याने आणि भयानक रूपाने तिने प्रेक्षकांना थक्क केलं. तिच्या मोठ्या डोळ्यांनी आणि बोल्ड अभिनयाने ती रातोरात स्टार बनली. पण समीक्षकांनी तिच्या अभिनयावर टीका केली होती, कारण त्यांना तिचा अभिनय एकसुरी वाटला. तरीही, तिची स्क्रीन प्रेझन्स आणि ग्लॅमरमुळे ती प्रेक्षकांची आवडती ठरली.

वीराना हा चित्रपट त्या काळातला सर्वात यशस्वी हॉररपैकी एक होता. कमी बजेट असूनही त्याने होम व्हिडिओ आणि टीव्हीवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. बप्पी लाहिरी यांचं संगीत आणि सुमन कल्याणपूर, मोहम्मद अझीझ यांच्यासारख्या गायकांनी गायलेली गाणी हा चित्रपट अविस्मरणीय बनला
या चित्रपटात जैस्मिनसोबत हेमंत बिर्जे, साहिला चढ्ढा, कुलभूषण खरबंदा आणि सतीश शहा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. रामसे ब्रदर्सनी या चित्रपटातून भयपट आणि ग्लॅमरचं एक अनोखं मिश्रण सादर केलं, ज्यामुळे वीराना आजही कल्ट क्लासिक मानला जातो.

वीराना नंतर जैस्मिन अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. तिच्या गायब होण्यामागे अनेक अफवा पसरल्या. काहींचं म्हणणं आहे की ती डिप्रेशनमुळे गायब झाली, तर काहींच्या मते तिला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याकडून धमक्या मिळाल्या, ज्यामुळे ती देश सोडून गेल्या.
काही रिपोर्ट्सनुसार, जैस्मिन आता अमेरिकेत राहते आणि तिथे ती यशस्वी उद्योजिका बनली, असं तिचे सह-कलाकार हेमंत बिर्जे याने सांगितलं. पण दुसरीकडे, रामसे ब्रदर्सपैकी एक, श्याम रामसे यांनी 2017 मध्ये सांगितलं की जैस्मिन अजूनही मुंबईत राहते आणि ती आपल्या आईच्या निधनानंतर अभिनय सोडला. खरं काय आणि खोटं काय, हे आजही एक रहस्य आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img