बॉलिवूडचा ‘शोले (Shole)’ हा चित्रपट म्हणजे एक सांस्कृतिक ठेवाच. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयातही अढळ स्थान मिळवलं. आता या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर भव्य पुनर्प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची ‘जय-वीरू’ ही जोडी आजही मैत्रीचं प्रतीक मानली जाते. त्यांची संवादशैली, बॉन्डिंग, आणि साहस पाहून आजच्या पिढीलाही त्यांचं आकर्षण वाटतं.
चित्रपटात अमजद खान (Ahmad Khan) (गब्बर), संजीव कुमार (Sanjeev Kumar) (ठाकूर), हेमा मालिनी (Hema Malini) (बसंती), असरानी (जेलर) यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. चित्रपटाचे संवाद सलीम-जावेद या दिग्गज जोडीने लिहिले होते. हा चित्रपट एकेकाळी सलग ५ वर्षे थिएटरमध्ये चालू राहण्याचा विक्रम गाठला होता. नंतर तो विक्रम ‘DDLJ’ ने मोडला. 2004, 2014 आणि 2024 मध्येही ‘शोले’चे पुन्हा प्रदर्शन झाले होते.जर तुम्ही हा चित्रपट घरी पाहण्याचा विचार करत असाल, तर ‘शोले’ अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनसह उपलब्ध आहे.
‘शोले’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो भारतीय सिनेमा इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. त्याचं पुन्हा थिएटरमध्ये आगमन म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा आणि नव्या पिढीला त्या काळाचा अनुभव देण्याची संधी आहे.