30.4 C
New York

Ghee During Pregnancy : गर्भधारणेत तुपाचे फायदे आणि तोटे, विज्ञान काय सांगते?

Published:

भारतात गर्भवती महिलांना अनेक पारंपरिक सल्ले दिले जातात. विशेषतः नवव्या महिन्यात तूप खाण्याबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. असे म्हटले जाते की तूप खाल्ल्याने प्रसूती सहज होते, बाळाची वाढ सुधारते आणि आईला ताकद मिळते. मात्र, यामागे स्पष्ट वैज्ञानिक आधार नाही. तूप पौष्टिक असले तरी त्याचे प्रमाणात सेवन करणे अत्यावश्यक आहे.

तुपाचे फायदे :

तुपामध्ये आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात, जे गर्भवती महिलेसाठी उपयुक्त ठरतात. गर्भधारणेदरम्यान होणारी बद्धकोष्ठता तूप थोड्याफार प्रमाणात कमी करू शकते. तूप शरीराला अंतर्गत उब व स्नेह देते, त्यामुळे प्रसूती सोपी होण्यास मदत होऊ शकते. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्समुळे मेंदूच्या विकासाला हातभार लागतो. प्रसूतीपूर्व व नंतरच्या काळात शरीराला गरज असलेल्या उष्णतेचा व पोषणाचा तूप चांगला स्रोत ठरतो.

परंतु, अति तूप हानिकारक

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्रासदायक असतो. जास्त तूप खाल्ल्याने . जे गर्भधारणेनंतर कमी करणे कठीण ठरते.अतिसार, मळमळ, अशक्तपणा जाणवू शकतो. पित्ताशयात खडे असलेल्या महिलांनी तूप टाळावे. मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या महिलांसाठी सावधगिरी आवश्यक कारण जास्त चरबीमुळे समस्या वाढू शकतात.

तूप किती खावे?

डॉक्टरांच्या मते, सामान्य बीएमआय असलेल्या गर्भवती महिलांनी दररोज २ ते ५ चमचे तूप आहारात घेणे योग्य ठरते. याचे प्रमाण वैयक्तिक प्रकृतीनुसार बदलते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तूप दूधात, रोटीत, पराठ्यात, लाडूत, पिन्नीत किंवा हलव्यात वापरता येते – पण प्रमाण लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तूप हा आरोग्यदायी पदार्थ आहे, पण त्याचा वापर वैज्ञानिकदृष्ट्या योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. “तूप खाल्ल्याने सामान्य प्रसूती हमखास होते,” हा फक्त पारंपरिक समज आहे. प्रत्येक महिलेची गर्भावस्था वेगळी असते. त्यामुळे अन्नपदार्थांबाबत कोणताही निर्णय वैद्यकीय मार्गदर्शनानेच घ्यावा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img