16.6 C
New York

Toll Plazza : स्थानिकांना टोल मधून सूट द्यावी यासाठी डुंबरवाडी टोल नाक्यावर आंदोलन 

Published:

अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर असलेला डुंबरवाडी ( ता.जुन्नर ) टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांकडून दरमहा साडेतीनशे रूपये तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना साडेसहा हजार रूपये टोल आकारणी करण्यासाठी टोल कंपनीने सक्ती केल्याने येथील स्थानिक संतप्त नागरिकांनी शांततेच्या मार्गाने रविवारी दि.१ जून रोजी टोलबंद आंदोलन केले.

आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे,माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले, जयसिंग तांबे, जालंदर पानसरे, अनिल तांबे,सुनील डुंबरे,देविदास तांबे,किरण भोर, यांच्यासह शेकडो स्थानिक वाहनचालक,नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी तानाजी तांबे म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हंटले होते की,जोपर्यंत अहिल्यानगर- कल्याण महामार्गाच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे व रस्ता दुभाजक काम पूर्ण होत नाही,तोपर्यंत डुंबरवाडीचा टोल सुरू होऊ देणार नाही, असे सांगितले होते.मग या रस्त्याचे काम अपूर्ण तरी तुम्ही टोल कसा सुरू केला? असा सवाल तांबे यांनी उपस्थित करून, टोल आकारणी करणाऱ्या कंपनीमध्ये अहिल्यानगरचे दोन पार्टनर आहेत आणि यांचा तिसरा छुपा स्थानिक पार्टनर कोण ? असा सवाल देखील तांबे यांनी उपस्थित केला.

आम्ही टोलची तोडफोड करणार नाही, शासनाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान करणार नाही, तुम्ही जोपर्यंत स्थानिक नागरिकांना टोल मधून सूट देत नाही, तो तोपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करणार आहोत अशी भूमिका स्थानिक नागरिक वाहनचालकांनी घेतली होती. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी घेतलेल्या भूमिकेनंतर टोल कंपनीचे संचालक यावेळी उपस्थित नसल्याने डुंबरवाडी टोलवरिल व्यवस्थापक यांनी  कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासित केल्यावर आठ दिवसाचा अल्टिमेट देवून ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून,ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img