19.2 C
New York

Bollywood : तारा सुतारिया आणि वीर पहाडियाची रोमँटिक सुरुवात

Published:

बॉलिवूडच्या गलियाऱ्यांमध्ये प्रेम, ब्रेकअप आणि नव्या नात्यांच्या चर्चांना कधीच अंत नसतो. अशीच एक नवीन प्रेमकहाणी आता समोर येत आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवोदित अभिनेता वीर पहाडिया (Veer Paharia) यांचे नाव जोडले जात आहे. कपूर कुटुंबातील लग्नसोहळ्यापासून ते ताराच्या नव्या प्रेमापर्यंत, ही कहाणी नाट्यमय वळणांनी परिपूर्ण आहे.

काही महिन्यांपूर्वी कपूर घराण्यात आनंदाचं वातावरण होतं. राज कपूर (Raj kapoor) यांची मुलगी रीमा जैन (Reema jain) यांचा मुलगा आदर जैन(Adar Jain) याने त्याची बालपणीची मैत्रीण आलेखा अडवाणीशी (Ālēkhā aḍavāṇīśī) लग्नगाठ बांधली. हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला, ज्याला संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होतं. या लग्नाआधी आदर आणि तारा सुतारिया यांच्या नात्याच्या चर्चांनी बॉलिवूड गाजलं होतं. दोघं लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा होती. पण अचानक त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि 2023 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. यानंतर आदरने आलेखाशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

आदर आणि आलेखाच्या लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमात आदरने दिलेल्या एका भाषणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. “आजपर्यंत मी फक्त टाइमपास केला, पण तुझ्यावर मी खरं प्रेम करतो,” असं तो आलेखाला उद्देशून म्हणाला. या वक्तव्याचा रोख तारा सुतारियाकडे होता, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आणि सोशल मीडियावर आदरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या वादाने तारा आणि आदरच्या भूतकाळातील नात्याला पुन्हा एकदा चर्चेत आणलं.

आदरच्या लग्नानंतर तारा सुतारियाच्या आयुष्यातही नवं पर्व सुरू झाल्याचं दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार, तारा गेल्या दोन महिन्यांपासून नवोदित अभिनेता वीर पहाडियाला डेट करत आहे. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shnde) यांचा नातू आहे. त्याने नुकतंच ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विशेष म्हणजे, या चित्रपटात त्याने अभिनेत्री सारा अली खानसोबत काम केलं आहे, जिच्याशी त्याचं नाव यापूर्वी जोडलं गेलं होतं. मात्र, सारा आणि वीरचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

सूत्रांनुसार, तारा आणि वीर यांच्यातील मैत्री काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलत असल्याचं दिसतंय. दोघं एकमेकांना समजून घेण्याचा आणि जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांना एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर करताना पाहिलं गेलं. डिनरनंतर तारा तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली, तर वीर थोड्या वेळाने तिथून निघाला. याआधी लॅक्मे फॅशन (Lakme Fashion Week) वीकमध्येही तारा आणि वीरने एकत्र रॅम्पवॉक करत उपस्थितांचं लक्ष वेधलं होतं.

तारा सुतारिया ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2 (Student Of The Year)’ या चित्रपटातून 2019 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘मरजावां’ (Marjawaan), ‘तडप’ (Tadap) यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली छाप पाडली. दुसरीकडे, वीर पहाडिया याने ‘स्काय फोर्स’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. त्याच्या अभिनयाची आणि लूकची सध्या बरीच चर्चा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img