21.5 C
New York

Kidney Stone : किडनी स्टोन असताना दही खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published:

किडनी स्टोन (Kidney Stone) म्हणजे मूत्रपिंडात तयार होणारे छोटे, कठीण खडे. हे प्रामुख्याने कॅल्शियम (Calcium), ऑक्सलेट किंवा युरिक अ‍ॅसिडच्या (Uric acid)जास्त प्रमाणामुळे तयार होतात. असे असताना दैनंदिन आहारात काय खावे आणि काय टाळावे, हे खूप महत्त्वाचे ठरते. अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो – किडनी स्टोन असताना दही खाल्ले तरी चालते का?

दही हे शरीरासाठी फायदेशीर समजले जाते कारण त्यात प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, प्रोटीन (Protien आणि विटॅमिन B असते. मात्र किडनी स्टोनच्या रुग्णांनी दह्याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. यामागचं कारण म्हणजे दहीमध्ये कॅल्शियम असते, जे काही प्रकारच्या किडनी स्टोनसाठी (विशेषतः कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन) कारणीभूत ठरू शकते.

तरीसुद्धा, संशोधन असं सांगतं की आहारातून मिळणारं नैसर्गिक कॅल्शियम (जसं की दह्यातून) मूत्रपिंडातील खडे होण्याचा धोका कमी करतं, कारण हे ऑक्सलेटशी बांधून शरीरातून बाहेर टाकलं जातं. त्यामुळे, दही अगदी टाळण्याची गरज नाही, पण ते प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणे योग्य ठरेल.

  • किडनी स्टोन असताना दही खाणे पूर्णपणे बंद करायची गरज नाही
  • दिवसातून एक वेळ आणि मर्यादित प्रमाणात दही चालू शकते
  • लो-फॅट आणि साखर नसलेलं दही वापरणं फायदेशीर
  • अती प्रमाणात दही खाल्ल्यास कॅल्शियमचे प्रमाण वाढू शकते, जे काही रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते
  • आपल्या स्टोनचा प्रकार लक्षात घेऊन आहार ठरवावा

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी नियमित पाणी प्यावे, ऑक्सलेटयुक्त अन्न जसे की पालक, बीट, चहा याचे सेवन मर्यादित ठेवावे, आणि कोणताही आहार बदल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img