17.1 C
New York

Cannes Red Carpet Stunner : कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली इंदोरची डॉक्टर!

Published:

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 (Cannes Film Festivale) हे केवळ चित्रपट कलाकारांसाठीच नव्हे, तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनाही आपली चमक दाखवण्याचं एक भव्य व्यासपीठ बनलं आहे. यंदाच्या कान्स रेड कार्पेटवर एक नाव सर्वत्र चर्चेत आहे – ते म्हणजे इंदोरच्या डॉ. निकिता कुशवाह यांचं!

वैद्यकीय क्षेत्रात हृदय व श्वसन फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निकिताने (Dr. Nikita) तिच्या ग्लॅमरस उपस्थितीने कान्समध्ये साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मिसेस युनिव्हर्स 2024 (Mrs. universe ) मध्ये पहिली उपविजेती ठरलेली निकिता ही केवळ सौंदर्याच्या बाबतीतच नाही, तर सामाजिक भान आणि वैचारिक सशक्ततेसाठीही ओळखली जाते.

डॉ. निकिताने यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या व्हिएतनाम एडिशनमध्ये भाग घेतला, जिथे भारताची संस्कृती, महिलांचे प्रतिनिधित्व आणि सामाजिक विषयांवर भर दिला गेला. तिने सादर केलेला लूक ‘फेअर गॉडेस ऑफ स्प्रिंग’ या थीमवर आधारित होता. तिचा फ्लेयर्ड आणि भव्य ट्रेल गाऊन होता जो Jolly Polly Couture या इंटरनॅशनल डिझायनर ब्रँडकडून खास बनवण्यात आला होता. या गाऊनसाठी तब्बल ५० हुन अधिक कारागिरांनी तीन महिने मेहनत घेतली, आणि त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याची माहिती आहे.

तिने परिधान केलेले हिऱ्यांचे दागिने, तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर आणि सौंदर्यसंपन्न चेहरा पाहता अनेकांनी तिला “डिझ्नी प्रिन्सेस” असंही संबोधलं. सोशल मीडियावर तिच्या लूकबद्दल कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

2024 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत 100 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींमध्ये निकिताने भारताचे नाव उंचावलं. तिचा हा प्रवास केवळ सौंदर्य स्पर्धांपुरता मर्यादित नसून, ती महिला सशक्तीकरण, आत्मविश्वास, आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img