18.8 C
New York

Lifestyle : युरिक ॲसिड वाढण्याचे कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

Published:

आपल्या शरीरात युरिक ॲसिड ही एक नैसर्गिकरित्या तयार होणारी रासायनिक प्रक्रिया आहे, जी प्रथिनांतील प्युरिन्स हे घटक फुटल्याने निर्माण होते. मात्र, जर याचे प्रमाण शरीरात जास्त झाले, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास सांधेदुखी, संधिवात, मूत्रपिंडाचे आजार किंवा किडनी डॅमेज होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच शरीरात याची पातळी संतुलित ठेवणे अत्यावश्यक असते.

युरिक ॲसिड वाढण्याची मुख्य कारणे:

रेड मीट, समुद्री मासे, मद्य आणि जास्त प्युरिन असलेले अन्न यांचे अधिक सेवन, शरीरात पाणी कमी होणे (डिहायड्रेशन) लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव
मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचे आजार,फॅमिली हिस्ट्री म्हणजेच अनुवंशिकता

युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे:

युरिक ॲसिड वाढल्यास काही वेळा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, पुढील त्रास जाणवू शकतात, सांधे सुजणे, विशेषतः पायाचे अंगठे, तीव्र वेदना आणि जळजळ, सांधांमध्ये कडकपणा, वारंवार मूत्रपिंडाच्या समस्या, युरिक ॲसिडची पातळी रक्त तपासणीतून समजते.

पुरुषांसाठी: 3.4 ते 7.0 mg/dL

महिलांसाठी: 2.4 ते 6.0 mg/dL
या पातळीपेक्षा जास्त असल्यास त्याला हाय युरिक ॲसिडेमिया असे म्हणतात.

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपाय:

  1. आहारावर नियंत्रण ठेवा:

साखर, गोड पेये, प्रॉसेस्ड फूड टाळा, ताज्या फळभाज्या, फायबरयुक्त अन्न, कडधान्य यांचे सेवन वाढवा,जास्त प्रथिनांचे स्रोत जसे की रेड मीट, शेलफिश, ऑर्गन मीट टाळा, लो-फॅट डेअरी प्रोडक्ट्सचा वापर करा

  1. भरपूर पाणी प्या:
    पाणी हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
  2. वजनावर नियंत्रण ठेवा:
    लठ्ठपणा युरिक ॲसिड वाढण्याचे मोठे कारण आहे. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
  3. फायबर वाढवा:
    दैनंदिन आहारात 5 ते 10 ग्रॅम अतिरिक्त फायबर घालणे आवश्यक आहे. हे इन्सुलिन संतुलनात ठेवते आणि युरिक ॲसिड कमी करण्यात मदत करते.
  4. तणाव कमी करा:
    तणावामुळेही युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. ध्यान, योग आणि विश्रांती यांचा अवलंब करा.
  5. गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या:
    जर लक्षणे तीव्र असतील तर डॉक्टरांकडून युरिक ॲसिड कमी करणारी औषधे (उदा. Allopurinol, Febuxostat) घेतली जातात.

कोणतेही उपाय करताना वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण युरिक ॲसिड वाढण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. आपल्या जीवनशैलीतील साधे बदल आणि नियमित तपासणीमुळे हा त्रास टाळता येऊ शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img