उन्हाळा म्हणजे अंगाची लाही लाही करणारी उष्णता, घामाचा त्रास आणि डिहायड्रेशनचा धोका. त्यामुळे या ऋतूत आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आपण अशा पदार्थांचे सेवन करतो जे थंड वाटतात, पण त्यांचे नैसर्गिक गुणधर्म उष्ण असतात. अशा गोष्टी आहारात घेतल्याने काही वेळासाठी आराम मिळतो, पण दीर्घकाळात आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण जे खातो त्याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी व डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी खालील नैसर्गिक थंड पदार्थांचा समावेश करावा:
काकडी – जलयुक्त व थंडाव्याची उत्तम स्रोत कलिंगड व टरबूज पाण्याने भरलेले फळ, शरीर हायड्रेट ठेवतात सत्तू सरबत उष्णतेपासून आराम देणारे पारंपरिक पेय लिंबू सरबत व नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध बडीशेप सरबत पचनास मदत करणारे व थंड परिणामकारक असतात.
- दूध
दूध आरोग्यास फायदेशीर असले तरी याचे स्वरूप उष्ण असते. उन्हाळ्यात गरम दूध टाळून शक्यतो थंड किंवा कोमट दूध घ्यावे. रात्रीच्या वेळी दूध घेणे शरीरासाठी अधिक योग्य असते. - दही
दही थंड वाटते, पण त्याचेही मूळ स्वरूप उष्ण आहे. परंतु त्यातील प्रोबायोटिक्समुळे ते पचनासाठी फायदेशीर असते. दही थंड पाण्यातून फेटून सेवन करणे अधिक योग्य ठरते. - तुळस
आयुर्वेदात तुळशीचे अनंत औषधी फायदे सांगितले आहेत. पण उन्हाळ्यात तुळशीचा जास्त वापर केल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे प्रमाणात सेवन करणे आवश्यक. - आंबा
आंबा हे उन्हाळ्याचे आकर्षण असले तरी ते उष्ण फळ आहे. त्याचा अतिरेक टाळावा. आंबा भिजवून खाल्ल्यास त्याचा उष्ण प्रभाव कमी होतो. - मध
मध थंड दिसतो पण उष्ण असतो. उन्हाळ्यात दररोज मध खाणे टाळावे किंवा आवश्यक असल्यास लिंबूपाण्यात थोडेसे मिसळून घ्यावे. - चीज व देशी तूप
दूधजन्य पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढू शकते. त्यामुळे यांचा मर्यादित वापर करावा.
उन्हाळ्यात बर्फाचे पदार्थ खाल्ले की लगेच थंडावा वाटतो, पण शरीरात त्याचा उष्ण परिणाम होतो. त्यामुळे बर्फाचे पदार्थ देखील संतुलित प्रमाणातच घ्यावेत. उन्हाळ्यात थंड वाटणाऱ्या पण उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहार घेणे हेच उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात आहारात थोडा बदल करा आणि शरीराला आतून थंड आणि ताजे ठेवा.