18.4 C
New York

Face Scrab : स्वयंपाकघरातील ”हे” घटक तुमचे सौंदर्य खुलवतील

Published:

वातावरणातील सतत बदल, वाढलेली आर्द्रता आणि उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणे याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज वाटू लागते आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या वाढतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता तर महत्त्वाची आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे नियमित एक्सफोलिएशन.

दर 8-10 दिवसांनी त्वचेला स्क्रबिंग करून मृत पेशी, घाण आणि त्वचेतील खोलवर साचलेले मळ दूर करता येतात. त्यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी दिसते आणि नैसर्गिक तेज येते. मात्र, बाजारातील स्क्रब्समध्ये केमिकल्स असतात, जे दीर्घकाळ वापरल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी घरगुती नैसर्गिक पर्याय अधिक सुरक्षित व प्रभावी ठरतात.

१. मसूर डाळ स्क्रब: त्वचेसाठी पोषणदायी व सौम्य उपाय

मसूर डाळ त्वचेच्या स्वच्छतेसाठी उत्तम मानली जाते. काही तास पाण्यात भिजवलेली डाळ बारीक वाटून त्यात कच्चे दूध मिसळून तयार केलेली पेस्ट त्वचेवर लावल्यास त्वचा कोमल होते आणि मेली पेशी दूर होतात. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी गोलाकार मसाज करा. यामध्ये हळद मिसळल्यास अँटीसेप्टिक गुणधर्म मिळतात, जे मुरुमांवर उपयोगी पडतात.

२. ओट्स स्क्रब: संवेदनशील त्वचेसाठी सर्वोत्तम

ओट्समध्ये त्वचेला शांत करणारे गुणधर्म असतात. दही किंवा गुलाबपाण्यात मिसळून तयार केलेल्या ओट्स पेस्टने चेहरा किंवा शरीर स्क्रब केल्यास कोरडी त्वचा मृदू बनते. ओट्समध्ये मध घालून स्क्रब्स केल्यास त्वचेचा ओलावा तसाच टिकून राहतो.

३. साखर स्क्रब: मृत पेशींसाठी प्रभावी उपाय

बारीक साखर हे एक उत्कृष्ट नैसर्गिक स्क्रब आहे. मध व लिंबाच्या रसासोबत साखर मिसळून वापरल्यास त्वचा उजळते आणि काळेपणा कमी होतो. साखरेत ऑलिव्ह ऑईल मिसळल्यास ड्राय स्किनला हायड्रेशन मिळतो.

४. कॉफी स्क्रब: रक्ताभिसरण वाढवणारा घटक

कॉफी पावडर स्क्रब म्हणून वापरल्यास त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल यामध्ये मिसळून हळुवारपणे चेहरा किंवा शरीर स्क्रब केल्यास त्वचा टवटवीत वाटते. कॉफी स्क्रबमुळे त्वचेवरील सेल्युलाइट कमी होण्यास मदत होऊ शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img