10.9 C
New York

Govinda : गोविंदा माझ्याशिवाय जगू शकणार नाही … सुनीताने केले ठाम वक्तव्य

Published:

बॉलिवूडमधील एक काळ गाजवलेले सुपरस्टार गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील मतभेद आणि संभाव्य विभक्ततेच्या चर्चांनी गेल्या काही महिन्यांत खळबळ माजवली होती. मात्र, या चर्चांपलीकडे या दोघांच्या नात्याचं एक वेगळंच वास्तव आहे – प्रेम, संघर्ष, आणि अजूनही टिकून असलेला विश्वास.

अनेक अफवांमध्ये हे देखील समोर आलं होतं की गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सुनिताने घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. खुद्द सुनिताने काही वेळा हे मान्य केलं होतं की ती आणि गोविंदा सध्या वेगळं राहत आहेत. त्यांच्या वकिलानेही नोटीसेची बाब पुष्टी केली होती. मात्र नंतर त्यांनी या नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या दीर्घकालीन नात्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

नुकत्याच एका मुलाखतीत सुनिताने स्पष्ट केले:
“अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा गोविंदा किंवा मी थेट काही सांगू तेव्हा ऐका. मला खात्री आहे की गोविंदा माझ्याशिवाय जगू शकणार नाही, आणि मलाही त्याच्याशिवाय जीवन शक्य वाटत नाही. तो कधीच कोणत्याही मूर्खपणासाठी आपलं कुटुंब सोडणार नाही,” असं ठाम मत सुनिताने व्यक्त केलं. ती पुढे म्हणाली, “जर काही खरंच घडलं, तर मीच सर्वप्रथम समोर येऊन सगळं स्पष्ट करीन. अफवांवर विश्वास ठेवणं योग्य नाही.”

गोविंदा आणि सुनिताची प्रेमकथाही तितकीच रंगतदार आहे. गोविंदा त्याच्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षात असताना सुनिताशी त्याची भेट झाली. त्या वेळी सुनिता नववीत शिकत होती आणि तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. योगायोग असा की त्या बहिणीने गोविंदाच्या मामाशी लग्न केलं होतं, त्यामुळेच ही ओळख घडली. सुरुवातीला दोघांचं नातं फारसं सौहार्दपूर्ण नव्हतं, पण कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

सुपरस्टार होण्याआधीच, 1986 मध्ये, गोविंदाने सुनिताशी गुपचूप विवाह केला. चार वर्षांपर्यंत दोघांनी हे लग्न सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. या दाम्पत्याला यशवर्धन आणि टीना अशी दोन अपत्यं आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img