आजच्या घडील परिस्थितीत चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढीचा त्रास सर्वसामान्य झाला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे डाएट प्लॅन्स (Diet Plan), फॅट बर्निंग फूड्स, (Burning Food ) मील रिप्लेसमेंट शेक्स यामुळे अनेकजण गोंधळात पडतात की नेमकं वजन कमी करण्यासाठी काय खावं? काही लोक महागड्या डाएट प्रॉडक्ट्सवर (Dry Fruits ) अवलंबून राहतात, तर काही साधं घरचं अन्न वजन नियंत्रणासाठी योग्य आहे का, याबद्दल शंका असतात.
घरी बनवलेले अन्न म्हणजेच डाळ, भाजी, भात, चपाती, दही आणि सॅलड यांचा समावेश असलेले जेवण हे पोषक, ताजं आणि संतुलित असतं. यात कोणतेही कृत्रिम घटक नसतात आणि आरोग्यानुसार कमी तेल, मीठ वापरून बनवता येतं. त्याच वेळी पोट भरलेलं राहिल्यामुळे जास्त खाण्याची सवय आपोआप कमी होते.
दुसरीकडे, डाएट फूडमध्ये ओट्स, (Oats) ग्रॅनोला, लो-कार्ब स्नॅक्स, शुगर (Sugar) फ्री प्रॉडक्ट्स यांचा समावेश असतो, जे तयार खाण्यास सोप्पे असले तरी त्यात अनेक वेळा कृत्रिम गोडवा, प्रिजर्वेटिव्ह्ज असतात. त्यातून लवकर परिणाम दिसतो पण दीर्घकाळासाठी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे वजन कमी करताना साधं घरचं अन्न हा एक टिकाऊ आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो. डाएट फूडचा वापर वेळेअभावी कधीमधी केला जाऊ शकतो, पण रोजच्या आहारात घरगुती अन्नच सर्वोत्तम ठरते – ते पोषण देतं, नैसर्गिक असतं आणि शरीराला दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवतं.