25.9 C
New York

Shraddha Walkar Murder Case : मुलीच्या न्यायाची इच्छा अधुरीच राहिली… श्रद्धा वालकरच्या वडिलांचं निधन

Published:

दिल्लीत २०२२ साली श्रद्धा वालकरची लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या आफताब पुनावाला याने तिची ३५ तुकडे करून हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. दिल्ली पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आफताबला अटक केली.या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. पोटच्या मुलीच्या हत्येपासून तिचे वडिल डिप्रेशनमध्ये गेले होते. मात्र आज श्रद्धा वालकर हिचे वडिल विकास वालकर यांचं अचानक निधन झालं आहे. विकास वालकर असं श्रद्धाच्या वडिलांचं नाव असून वसईत राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे.

आज सकाळी ८ वाजता विकास वालकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती.त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचे वडिल हे निराश होते. मुलीला न्याय कधी मिळणार यासाठी ते प्रतिक्षा करत होते. श्रध्दाच्या अंत्य संस्कारांसाठी तिच्या मृतदेहाच्या उर्वरित भाग ताब्यात मिळावेत, यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.

दरम्यान, लेकीच्या हत्येनंतर आज अचानक वडिलांचे निधन झाल्याने श्रद्धाच्या आरोपीला न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय विकास वालकर यांच्या निधनानंतर श्रद्धा वालकरच्या न्यायाची प्रतिक्षा ही कायम राहिल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img