20 C
New York

Mumbai Megablock : मुंबईकरांनो सावधान! आज तिन्ही मार्गांवर ‘मेगा’ब्लॉक

Published:

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर घेण्यात येत आहे. उपनगरीय मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल ?

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत

हार्बर मार्गाचं वेळापत्रक कसं असेल ?

कधी : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कुठे : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल?

कुठे : ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत

दरम्यान, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 यादरम्यान असेल.हार्बर मार्गावर असलेल्या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.पश्चिम मार्गावर यादरम्यान चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img