दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाला पायउतार करुन टाकले. या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत पार केले. भाजपाच्या लाटेत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांसारखे दिग्गज पराभूत झाले.यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री (Delhi Elections) कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आज मुख्यमंत्रीपदावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी चर्चा पार पडली. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बैजयंत पांडा, बीएल संतोष उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारीला भारतात परततील. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. हा समारंभ भव्य करण्याचे भाजपाचे नियोजन आहे. याआधी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी नड्डा, अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार (Election Commission of India) दिल्लीत भाजपला 45.56 टक्के आणि आम आदमी पक्षाला 43.57 टक्के मते मिळाली. भाजपने 48 जागा जिंकून भाजपने विजयी आघाडी घेतली. आम आदमी पक्षाला मात्र 22 जागा मिळाल्या.
या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ चा दारुण पराभव झालाय. आप मधील दिग्गज नेत्यांच्या पराभवाने दिल्लीत आपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा कमळं फुललं आहे.