33 C
New York

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ कमळ हाती घेणार ?

Published:

१५ डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यात महायुतीच्या ३९ च्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर काहींच्या पदरात निराशा पडली. त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा प्रामुख्याने समावेश होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा असताना ऐन वेळेत त्यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांची नाराजी दिसून आली. मात्र अनेक दिवसांपासून सुरु असलेली नाराजी संपवण्यासाठी राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळांकडे आलेला नाही. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.

‘जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना’असं म्हणत छगन भुजबळांनी आपल्या मनातील नाराजी माध्यमांसमोर उघड केली होती. मनातील खदखद व्यक्त करुनही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत भाष्य केलं मात्र राष्ट्रवादीतील कोणत्याही बड्या नेत्यांनी त्यांची भेट न घेतल्याने नाराजी अधिक वाढली. त्यामुळे छगन भुजबळ पक्षातून काढता पाय घेत नव्या पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला मंत्रिपद द्यायचं होतं असं छगन भुजबळ म्हणाले होते.त्यानुसार छगन भुजबळ हे कोणती भुमिका घेणार याकडे सर्वाचंच लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीकॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील, छगन भुजबळ यांना शरद पवार गटात येण्याचं आवतन दिलं आहे.भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Beed Murder Case : सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली तर त्यांच्याजवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी, भाजपमध्ये विलीन होणं आणि ओबींसीचं देशव्यापी संघटनं उभं करणं असे तीन पर्याय उभे राहतात.त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यातील कोणता छगन भुजबळ निवडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img